दसऱ्यापूर्वी सोन्याचे दर आकाशात...१ तोळा १,१६,४०० रुपये

    दिनांक :29-Sep-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Today's rate of 24 karat gold दसऱ्यापूर्वी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून ग्राहकांच्या खिशाला याचा परिणाम दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असलेल्या सोन्याच्या दरात आजही जोरदार वाढ झाली आहे. गुड रिटर्न्सच्या माहितीनुसार, आज २४ कॅरटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ९२० रुपये वाढ झाली असून, आता यासाठी १,१६,४०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. २४ कॅरटच्या १० तोळा सोन्याच्या दरात ९,२०० रुपयांची वाढ झाली असून, यासाठी आता ११,६४,००० रुपये मोजावे लागणार आहेत.
  
 
Today
२२ कॅरटच्या सोन्यात देखील वाढ झाली आहे. २२ कॅरटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ८५० रुपयांची वाढ झाली असून, यासाठी १,०६,७०० रुपये खर्च करावा लागेल. तर २२ कॅरटच्या १० तोळा सोन्याच्या दरात ८,५०० रुपयांची वाढ झाली असून, यासाठी १०,६७,००० रुपये खर्च करावा लागणार आहे. आधी २२ कॅरटच्या १० तोळा सोन्याचे दर १०,५८,५०० रुपये होते. १८ कॅरट सोन्यातही वाढ दिसून आली आहे. Today's rate of 24 karat gold १८ कॅरटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ६९० रुपयांची वाढ झाली असून, यासाठी ८७,३०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. १८ कॅरटच्या १० तोळा सोन्याच्या दरात ६,९०० रुपयांची वाढ झाली असून, यासाठी ८,७३,००० रुपये मोजावे लागणार आहेत. शनिवारी १८ कॅरटचे १० तोळे सोनं ८,६६,१०० रुपयांनी विकले गेले होते.
 
चांदीच्या दरातही आज वाढ झाली आहे. एक ग्राम चांदीच्या दरात १ रुपयांची वाढ झाली असून, यासाठी १५० रुपये खर्च करावे लागणार आहेत. १ किलो चांदीच्या दरात १,००० रुपयांची वाढ झाली असून, यासाठी १,५०,००० रुपये खर्च करावे लागणार आहेत. सोनं-चांदीच्या दरात वाढ झाल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी दिसून येत आहे, विशेषतः दसऱ्याच्या सणाच्या काळात खरेदीसाठी जाणाऱ्या लोकांसाठी हा महागाईचा परिणाम मोठा आहे.