समृद्धी महामार्गावरील अपघातात दोन ठार

    दिनांक :29-Sep-2025
Total Views |
मंगरूळनाथ,
accident on samruddhi तालुक्यातील समृद्धी महामार्गावर २७ सप्टेंबर रोजी रात्री १ वाजता च्या दरम्यान झालेल्या तीन वाहनाच्या अपघातामध्ये दोन जण ठार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंगरूळनाथ पोलिसांनी २८ सप्टेंबर रोजी आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 
 

समृद्धी  
 
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोकॉ विजय ज्ञानदेव डोंगरे यांनी फिर्यादीत असे नमूद केले कि २७ सप्टेंबर रोजी रात्री १ वाजता च्या दरम्यान समृद्धी महामार्गावर वनोजा फाट्याजवळ आयशर क्र सि.जी ०८ ए. व्ही ०५७५ चालक यांने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून महींद्रा पिक अप क्र. एम.एच ४४ यू. १८८३ या वाहनाचे चालक ईमरान रफिक शेख वय २८ व लिनर ईमरान मकबूल शेख वय ३० दोन्ही रा. औसा जि. लातूर याच्या मरणास व वाहनाचे नूकसानीस कारणीभूत ठरला. आयशर चालक यांचे विरुद्ध पोस्टे ला येवून तक्रार दिल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार किशोर शेळके आणि सपोनी मल्लिकार्जुन वाघमोडे यांनी घटनास्थळाची भेट दिली.accident on samruddhi घटनेचा पुढील तपास सपोनी शुभांगी थोरात करीत आहे.