पुणे,
Vaishnavi Hagavane case पुण्यातील बहुचर्चित वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मोठा न्यायिक निर्णय समोर आला आहे. नऊ महिन्यांच्या बाळाची आई असलेल्या वैष्णवी हगवणेने सासरच्या छळाला कंटाळून १६ मे रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणात सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे आणि पतीच्या मित्र निलेश रामचंद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप होते. पुणे न्यायालयाने या तिघांचा जामीन अर्ज फेटाळत त्यांना तुरुंगातच ठेवण्याचा आदेश दिला.
कोर्टाने म्हटले की, नऊ महिन्यांच्या बाळाची आई कोणत्याही दबावाशिवाय असा टोकाचा निर्णय घेऊ शकत नाही. हुंडाबळी हा समाजाला मोठा कलंक आहे आणि आरोपींवर आत्महत्येला प्रवृत्त करणे, कट कारस्थान रचणे, पुरावे नष्ट करणे व आरोपींना लपवण्याचे गंभीर आरोप आहेत. त्यामुळे आरोपींना जामीनावर सोडल्यास साक्षीदारांवर दबाव येण्याची किंवा पुराव्यात छेडछाड होण्याची शक्यता आहे. न्यायालयाने पीडितेच्या हक्कासोबत समाजहित लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे सांगितले.
पुणे न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळताना सांगितले की आरोपींना तुरुंगात ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून साक्षीदारांवर दबाव येण्याची किंवा पुराव्यात छेडछाड होण्याची शक्यता टाळता येईल. ही कारवाई आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या गंभीर आरोपाखाली करण्यात आली असून आरोपींना तुरुंगात राहावे लागणार आहे.