सोन्याच्या श्रीमंतीत नटलेली वर्धेची सार्वजनिक देवी

५६ वर्षांची परंपरा सराफ लाईनची सुवर्णमय आरास,देवीसाठी कपड्याचे दुकान रिकामे

    दिनांक :29-Sep-2025
Total Views |
वर्धा
Wardha Durga Devi, वर्धेकर दिलदारच आहेत. ते प्रत्येक गोष्टीतून सिद्ध होतं. अगदी कमलनयन बजाज यांनी आपली शेकडो एकर जागा महात्मा गांधींना दान दिली होती. अन्नदानाच्या बाबतीत तर विचारूच नका. संधी मिळाली की लावला लंगर! खाणार्‍याला अजीर्ण होईल. पण, खाऊ घालणार्‍यांचे हात थांबत नाहीत. असाच काहीसा किस्सा सराफ लाईनच्या सार्वजनिक दुर्गादेवी मंडळाचा आहे. येथे दुर्गा मातेला २४ कॅरेट सोन्याचे दागिणे, चांदीची आरास आणि डायमंडची अंगठी सुद्धा घालण्यात आली आहे. एखाद्या श्रीमंत मंदिराप्रमाणे या मंडळाची वाटचाल सुरू आहे. विशेष म्हणजे छगनलाल बत्रा हे जवळपास १० दिवस आपले कपड्याचे दुकान देवीसाठी रिकामे करून देतात.
 

Wardha Durga Devi, 
वर्धा शहरातील सुप्रसिद्ध सराफ लाईन सार्वजनिक देवी मंडळाने यंदा ५६ व्या वर्षात पदार्पण केले. मंडळाच्या वतीने देवीला सोन्याचे हार, चांदीचा आकर्षक आर्च आणि हिर्‍याची अंगठी अर्पण करून भाविकांना देवीचे वैभवदर्शन घडत आहे. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे सराफ लाईनमधील व्यापार्‍यांची निस्वार्थ सेवा. शहरातील नामांकित कपडा व्यापारी छगन बत्रा यांनी यंदाही आपले संपूर्ण दुकान देवीच्या स्थापनेसाठी गेल्या चार वर्षांपासुन रिकामे करून देतात. दागिन्यांच्या प्रकाशात उजळलेले हे ठिकाण भाविकांसाठी सोन्याचे मंदिरच भासते. भाविकांच्या गर्दीत ‘जय माता दी’च्या गजरात देवीचे दर्शन घेताना सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा मोहक लखलखाट डोळ्यांचे पारणे फेडतो. अर्धशतकाहून अधिक काळापासून सुरू असलेली ही परंपरा आजही वर्धेच्या नवरात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरते. वर्धेची नवरात्र उत्सवाची शान वाढली आहे. भाविकांसाठी ही केवळ आरास नाही तर श्रद्धा, एकता आणि परंपरेचं सुवर्ण प्रतीक आहे.
 
 
 
येथे गेल्या अनेक वर्षांपासुन आरोग्य तपासणी आणि रतदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. दोन महिन्यांपूर्वी चरखा भवन येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आरोग्य शिबिराची साखळी कायम ठेवल्याबद्दल या मंडळाचा सत्कार करण्यात आल्याची माहिती बत्रा यांनी दिली. यंदा ३०० जणांची नेत्र तपासणी करण्यात आली.