अमरावतीत वेश्याव्यवसायाचा भंडाफोड

-प्रसाद कॉलनीतल्या अपार्टमेंटवर धाड -एक वर्षापासून सुरू होता कुंटणखाना

    दिनांक :30-Sep-2025
Total Views |
अमरावती, 
Amravati-prostitution busted : शहरातल्या प्रसाद कॉलनीतल्या एका अपार्टमेंटवरमधील दोन सदनिकांवर धाड टाकून पोलिसांनी वेश्याव्यवसाचा भंडाफोड केला आहे. सदर कुंटणखाना चालविणार्‍या दोन महिला व ४ तरूणी अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतल्या आहे. ही कारवाई मंगळवारी दुपारनंतर करण्यात आली.
 
 
 
amt
 
 
 
शहर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदिप चव्हाण यांना माहीती मिळाली कि, फ्रेजरपुरा पोलिस स्टेशन हद्दीतील प्रसाद कॉलनी येथील एका अपार्टमेंटच्या पहिल्या व दुसर्‍या मजल्यावरील दोन फ्ॅलटमध्ये दोन महिला अन्य चार तरूणींनासोबत घेऊन देहव्यापार करीत आहे. माहितीची खात्री पटल्यावर बनावट ग्राहक सदर फ्लॅटवर पाठविण्यात आला. त्याच्याकडून संकेत मिळताच गुन्हे शाखा पथकाने पंचासह छापा टाकला. तेव्हा पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमधून कुंटणखाना चालविणारी महिला व दोन तरूणी तसेच दुसर्‍या मजल्यावरील फ्लॅटमधून कुंटणखाना चालविणारी दुसरी महिला व दोन मुली यांना ताब्यात घेण्यात आले.
 
 
सदर ठिकाणी कुंटणखाना चालविणार्‍या महिला आरोपींकडून माहीती घेतली असता मागील वर्षभरापासून या महिला कुंटणखाना चालवित असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दोन्ही फ्लॅट कुंटणाखाना चालविणार्‍या महिलांच्या स्वत:च्या नावे आहेत. सदर महिलांच्या मोबाईल क्रमांकाची पडताळणी करून त्यांना मदत करणार्‍या व त्यांचेकडे ग्राहक म्हणून जाणार्‍यांची गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांना आवाहन आहे की, अमरावती शहरात अशा प्रकारे अवैधरित्या
कुंटणखाना/वेश्याव्यवसाय कोठे चालू असल्यास पोलिसांना तात्काळ माहीती दयावी. माहीती देणार्‍यांचे नाव गोपिनय ठेवण्यात येईल. ही कारवाई गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांचे नेतृत्वाखाली सपोनि अमोल कडू, अंमलदार
जहीर शेख, मनोज ठोसर, अतुल संभे, संग्राम भोजने, राहूल ढेंगेकार, राहुल दुधे महिला अंमलदार वर्षा घोंगळे यांनी केली.