राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत अमरावतीचे यश

१ सुवर्ण, ४ रौप्य आणि ७ कांस्य पदक

    दिनांक :30-Sep-2025
Total Views |
अमरावती, 
State Level Yogasana Competition : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन तथा बृहन्महाराष्ट्र योग परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहाव्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत अमरावती जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करीत १ सुवर्ण, ४ रौप्य आणि ७ कांस्य पदकांची कमाई केली. सदर स्पर्धा सब-ज्युनियर व ज्युनियर गटाची ध्रुव ग्लोबल स्कूल, संगमनेर येथे, सीनियर गटाची आनंदनिकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा येथे तसेच सीनियर ए.बी.सी. गटाची विभागीय क्रीडा संकुल, छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली.
 
 
 
jlk
 
 
 
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या स्पर्धेत स्वप्निल ईखार यांनी लेग बॅलन्स फॉरवर्ड या इव्हेंटमध्ये सुवर्ण तर सुपाईन इंडिविदुलमध्ये रौप्य पदक मिळविले. मीनल काकड यांनी लेग बॅलन्समध्ये रौप्य पदक पटकावले. लक्ष्मी गोस्वामी, नीता मुंडला, प्रमोद कळमकर आणि आशिष राजुरकर यांनी प्रत्येकी कांस्य पदक मिळविले. वरोरा येथील सीनियर गटात जागृती पटले हिने रौप्य पदक मिळविले. तर यश राठी आणि गौरव सगळे यांनी रिदमिक पैर आणि आर्टिस्टिक पैरसाठी रौप्य पदके पटकावली. तसेच दर्शन जाधव व ऋत्विक भुयारकर यांनी पाचवा क्रमांक मिळविला.
 
 
हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, सचिव प्रा. डॉ. माधुरी चेंडके, तसेच योगगुरू डॉ. अरुण खोडसकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. अमरावती जिल्ह्याचे नियोजन व प्रशिक्षण डॉ. वशिष्ठ खोडसकर यांनी केले. त्यांना डॉ. मंगला राजुरकर, स्वाती गाडेकर, स्वप्निल मोरे, मिताली गंगथडे, कोच दीप्ती राणे, हर्ष त्यागी व प्रा. संदीप मांदळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.