डॉ. बालाजी राजूरकर यांच्या संशोधनास आंतरराष्ट्रीय पेटेन्ट

    दिनांक :30-Sep-2025
Total Views |
हिंगणघाट,
Balaji Rajurkar : स्थानिक रा. सु. बिडकर महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच वनस्पतीशास्त्राचे संशोधक डॉ. बालाजी राजूरकर यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे युकेच्या इंटेलेचुअल प्रॉपर्टी ऑफिसने पेटेन्ट दिलेले आहे. त्यांना एलसीएमएस फार प्रेडिटिंग इम्पुरिटी प्रोफाईल ऑफ सिंथेटिक कंपाऊंड या उपकरणाच्या डिझाइनकरिता सदर पेटेन्ट मिळाले आहे. त्यांचे संशोधक विद्यार्थी अंकित नाकडे यांच्यासोबत संशोधनाचे कार्य करून हे यश प्राप्त केले आहे.
 

j 
 
वायू क्रोमॅटोग्राफी—मास स्पेट्रोमेट्री (जीसी-एमएस) उपकरण वनस्पती रसायन विश्लेषणासाठी जीसी एमएस ही एक प्रभावी हायपनेटेड टेनिक आहे, जी वायू क्रोमॅटोग्राफी (जीसी)ची विभाजन क्षमता आणि मास स्पेट्रोमेट्री (एमएस)ची ओळख पटविण्याची क्षमता एकत्र आणते. वनस्पतींच्या अर्कांमध्ये, आवश्यक तेले व हर्बल औषधांमध्ये आढळणार्‍या, उडून जाणार्‍या आणि अर्ध-उडून जाणार्‍या संयुगांसाठी याचा व्यापक वापर केला जातो.
 
 
वायू क्रोमॅटोग्राफ वाहक वायू प्रणाली हेलिअम, नायट्रोजन किंवा हायड्रोजनसारखे निष्क्रिय वायू वापरले जातात. विश्लेषित पदार्थांचे वहन करण्यासाठी सतत प्रवाह व दाब राखला जातो. इंजेशन प्रणालीमध्ये वनस्पती अर्क इंजेट केला जातो. संगणक आधारित सॉफ्टवेअर क्रोमॅटोग्राम दर्शवते, पीक एकत्रित करते आणि स्पेट्रल लायब्ररींच्या मदतीने संयुगांची ओळख पटवते.
 
 
या संशोधनाचे श्रेय राजूरकर यांनी ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्ष डॉ. उषाकिरण थुटे, डॉ. एन. एम. डोंगरवार, डॉ. रुपेश बढेरे, डॉ. दयानंद गोगले, डॉ. लालचंद दलाल, निसर्ग साथी फोरमचे सर्व सदस्य, नातेवाईक व मित्र मंडळींना दिले आहे.
 
 
उपकरणाची कार्यपद्धती
 
 
वनस्पती अर्क इंजेटरमध्ये वायूरूप केला जातो. अस्थिर वनस्पती रसायने उकळण्याचा बिंदू व ध्रुवतेनुसार कॉलममध्ये विभाजित होतात. कॉलममधून बाहेर पडलेले संयुग आयनीकरण कक्षात जातात व इलेट्रॉन इम्पॅटमुळे तुकडे होतात. निर्माण झालेले आयन त्यांच्या एम/झेड मूल्यानुसार विभाजित होतात. डिटेटर आयनची तीव्रता नोंदवतो, मास स्पेट्रम तयार होते आणि लायब्ररी डेटाबेसशी तुलना करून संयुगांची ओळख पटते. टर्पेनॉइड्स, अल्कलॉइड्स, फ्लॅव्होनॉइड्स, फिनॉलिस व आवश्यक तेले यांची ओळख, औषधी वनस्पतींमधील जैवक्रियाशील शोधणे, हर्बल औषधे व गुणवत्तेचे नियंत्रण, बिया, पाने व मुळांमधील अस्थिर तेलांचे प्रोफाईलींग, ही या उपकरणाची कार्यपद्धती आहे.