ऑक्टोबरची सुरुवातही पावसाळी; मराठवाडा-विदर्भात अलर्ट

    दिनांक :30-Sep-2025
Total Views |
मुंबई,
beginning of October is also rainy गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात पावसाने प्रचंड थैमान घातले. सप्टेंबर महिन्यात मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊन शेकडो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले. पिकांचे नुकसान, जनावरांची हालअवस्था आणि घरांची उद्ध्वस्त स्थितीमुळे ग्रामीण भागात संकटाचे ढग दाटून आले. आता काही ठिकाणी पावसाचा जोर ओसरला असला तरी हवामान खात्याने पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागराच्या पश्चिम भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील चार दिवस महाराष्ट्रातील विविध भागांना पावसाचा तडाखा बसणार आहे. ३ ऑक्टोबरपर्यंत मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
 
 \
beginning of October is also rainy
 
३० सप्टेंबर रोजी नांदेड सोडल्यास राज्यात अन्यत्र पावसाची शक्यता नाही, मात्र नांदेडला यलो अलर्ट देण्यात आला आहे. १ ऑक्टोबरपासून रत्नागिरी, सातारा घाटमाथा, तसेच विदर्भातील बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे पावसाचा इशारा आहे. beginning of October is also rainy २ ऑक्टोबर रोजी मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. उर्वरित मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीला यलो अलर्ट आहे. याशिवाय रत्नागिरी आणि सातारा घाटमाथ्यावरही जोरदार पावसाचा अंदाज आहे. ३ ऑक्टोबर रोजी संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
 
 
मराठवाड्यात बीड, परभणी, हिंगोली, नांदेड व लातूर जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा घाटमाथ्यावर पावसाची शक्यता आहे. राज्याच्या बहुतांश भागात हलका पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला गेला आहे. सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे आधीच कोलमडलेल्या शेतकऱ्यांसाठी ऑक्टोबरच्या सुरुवातीला पुन्हा पावसाचा धोका मोठे आव्हान ठरणार आहे. खरीप पिकांच्या हंगामावर या पावसाचा नेमका किती परिणाम होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.