डिजिटल व्हिलेज सातनवरीत बीएसएनएलचे भारतनेट

- मुख्य महाव्यवस्थापक यश पान्हेकर यांची माहिती - बीएसएनएलच्या प्रवासात डिजिटल दरी झाली कमी

    दिनांक :30-Sep-2025
Total Views |
नागपूर,
bsnl : मध्यवर्ती नागपूर मध्ये ऑप्टिकल फायबर नेटवर्कची लांबी सुमारे २२०० किलोमीटर असून देशातील पहिले डिजिटल व्हिलेज असणारे नागपूर सातनवरी या गावामध्ये देखील बीएसएनएलच्या भारतनेट या हाय स्पीड ऑप्टिकल फायबर कनेक्टिव्हिटी आणि बँड सुविधेचा उपयोग होत असल्याची माहिती बीएसएनएलचे मुख्य महाव्यवस्थापक यश पान्हेकर यांनी पत्रपरिषदेत दिली. याप्रसंगी बीएसएनएल नागपूरचे संचालक विभागाचे व्यवस्थापक प्रशांत पानतोडे, प्रशांत गणवीर, मुख्य जनसंपर्क अधिकारी व्यंकटेश्वर पराते आदी उपस्थित होते.
 
 
bsnl
 
 
 
३९५ टॉवरच्या माध्यमातून ४ सेवा
 
 
नागपूर जिल्ह्यामध्ये २ लाख २७ हजार पेक्षा जास्त बीएसएनएलचे मोबाईल ग्राहक असून ब्रॉडबँड कनेक्शनचे ८६८ तर फिक्स्ड लँडलाईन इंटरनेट कनेक्शनचे ग्राहक २४ हजारापेक्षा जास्त आहेत. नागपूरमध्ये ३९५ टॉवरच्या माध्यमातून ४ जीच्या सेवा देण्यात येत आहेत. बीएसएनएलने लँडलाईन टू ब्रॉडबँड, फायबर टू होम, भारत नेट आणि आता स्वदेशी ४ नेटवर्क असा प्रवास केला असून शहरी आणि ग्रामीण डिजिटलची दरी कमी केली आहे.
 
केंद्रीय संचार आणि टेलिकम्युनिकेशन मंत्रालया अंतर्गत येणार्‍या भारत संचार निगम लि. बीएसएनएलला १ ऑक्टोबर रोजी २५ वर्षे पूर्ण करीत आहे. रजत महोत्सवप्रसंगी विविध उपक्रम राबविल्या जात आहे. दूरसंचार क्षेत्रामध्ये नागपूरच्या भौगोलिक स्थानाचे महत्त्व कायम असून देशाचे स्थान असल्याने दूरसंचार क्षमतेच्या दृष्टीने हे मोक्याच ठिकाण आहे. मध्यवर्ती नागपूर क्षेत्रात काही बिघाड झाल्यास दिल्ली तसेच ईशान्य भारतातील दूरसंचार यंत्रणा ढासळण्याची शक्यता निर्माण होण्याची शक्यता असते.
 
 
बीएसएनएलच्या जागा भाडेतत्वावर
 
 
मागील आर्थिक वर्षात बीएसएनएल नागपूर विभागाचे उत्पन्न १२१ कोटी रुपये होते. नागपूर बीएसएनएलने उत्पन्न वाढीसाठी आपल्या मालकीच्या शहरातील तसेच शासकीय जागा तसेच इमारती विविध केंद्र राज्य तसेच सार्वजनिक उपक्रम क्षेत्राच्या विभागांना भाडेतत्वावर दिल्या असून त्या माध्यमातून बीएसएनएल नागपूरला दरवर्षी सुमारे ८.५ कोटी महसूल प्राप्त करीत आहे.