ओबीसीवरील अन्यायकारक निर्णय रद्द करा : प्रमोद पिंपरे

(नागपूरमध्ये 10 ऑक्टोबरला भव्य मोर्चा)

    दिनांक :30-Sep-2025
Total Views |
गडचिरोली, 
OBC-Pramod Pimpre : महाराष्ट्र सरकारने हैद्राबाद गॅझेटवर आधारित 2 सप्टेंबर रोजी काढलेला काळा शासकीय निर्णय हा ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे. हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा. या अन्यायाविरोधात 10 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, लाखोंच्या संख्येने ओबीसी बांधवांनी या मोर्च्यात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रमोद पिंपरे यांनी शिर्डीत झालेल्या राज्यस्तरीय कार्यकारिणीच्या बैठकीत केले.
 
 
 
KL;
 
 
 
या बैठकीत प्रमुख मार्गदर्शन महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे, आमदार विजयवडेट्टीवार यांनी दूरध्वनीद्वारे केले. प्रांतिक प्रदेशाध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी प्रांतिक महासचिव डॉ. भूषण कर्डीले, कार्यकारी अध्यक्ष गजानन शेलार, ओबीसी अभ्यासक विलास काळे, युवा आघाडी अध्यक्ष अतुल वांदिले, महिला आघाडी अध्यक्षा पुष्पाताई बोरसे यांच्यासह प्रांतिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.