शासनाची 85 रु. प्रती गुंठा मदत

नाकारली : शेतकऱ्यांचा रोष

    दिनांक :30-Sep-2025
Total Views |
हदगाव,
government assistance नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शासनाने प्रति गुंठा 85 रुपये नुकसान भरपाई जाहीर केली. मात्र, करमोडी येथील शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या ठरावाद्वारे ही मदत नाकारली. ठरावात नमूद आहे की, जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून सोयाबीन, कापूस, तूर, हळद यासारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी कुटुंबे हतबल अवस्थेत आहेत.
 
 

शेतकरी  
 
 
प्रत्यक्ष नुकसानीनुसार प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करावी, पिकविमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना 100% नुकसानीचा परतावा द्यावा, तसेच सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी.government assistance या निवेदनावर सरपंच ज्योती पंचलिंगे, पोलिसपाटील गजानन आलेराव, सुनील आलेराव, शिवकांत आलेराव, गजानन आलेराव, कोंडबा पवार, विठ्ठल शिंदे, शिवा आलेराव आणि शेकडो शेतकऱ्यांची स्वाक्षरी आहेत.