अर्जुनी मोर. (गोंदिया)
Husband and wife killed in Gondia accident वडसा- अर्जुनी मार्गावर अर्जुनी लगत तावशी खुर्द फाट्यावर एक विचित्र अपघाताची घटना २९ सप्टेंबर रोजी सांयकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान घडली. यात ट्रक आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील पतीपत्नीचा दुर्दैवी मृत्यु झाला. मुखरू जीवन नाकाडे (६२) आणि मालता मुखरू नाकाडे ( ५७ ) रा. टोला कोरंभी अशी मृतांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार मृतक दांपत्य अर्जुनी मोरगाव येथे नातेवाईकाकडील पूजा आटोपून स्व-गावी जाण्यासाठी निघाले होते. अर्जुनी शहराच्या बाहेर तावशी टी पॉईंट जवळ समोरून वडसा अर्जुनी मार्गे टोमॅटो भरून जात असलेल्या ट्रक क्रमांक ट्रक एपी ३७ टीके १५८९ च्या चालकाने समोरासमोर जोरदार धडक दिली.

धडकेत दुचाकी क्रमांक एमएच ३५ एम ६३०१ वरील चालक मुखरू नाकाडे व त्यांच्या पत्नी मालता यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. दोघेही पती-पत्नी अर्जुनी-मोर.येथे नातेवाईकाकडे कथेच्या जेवणाला आले होते. कथा कार्यक्रम आटोपून निघाले असता समोरून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या मृतक मुखरू नाकाडे यांच्या डोक्यावरून ट्रक गेल्याने डोका पुर्णतः चेंदामेंदा झाल्याची माहिती समोर आली आहे. दुचाकी ट्रक मध्ये फसून असल्याने ट्रक चालकांना पळता आलं नाही. लागलीच माहिती अर्जुनी मोरगाव पोलिसांना मिळताच अर्जुनी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून दोन्ही मृतकांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे पोहोचवले.