गोंदिया,
murder accused एका 7 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करणार्या नराधम आरोपीला विशेष जलदगती सत्र न्यायालयाने 20 वर्षाचा सश्रम कारावास व 5 हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा आज 30 सप्टेंबर रोजी ठोठावली. काल्या उर्फ प्रितम ठवरे (33) रा. अर्जुनी मोर असे शिक्षा झालेल्या नराधमाचे नाव आहे.
पिडीता ही तिच्या आजोबांना गावातील चौकात बोलावण्यासाठी 16 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास गेली असता तिला आरोपी काल्या भेटला. दरम्यान पिडीताने काल्याला पोळ्याचा बोजारा दे असे म्हटले. यावेळी काल्याने ‘घरी चल, तुला पैसे देतो’ असे म्हणून पिडीतेला त्याच्या घेरी नेले. घरी त्याने पिडीतेला त्याचा मोबाईल पाहण्यास दिला. यानंतर त्याने पिडीतेवर लैंगिक अत्याचार केला. पिडीता घाबरून तेथून पळून तिने घर गाठत घडलेला प्रकार आजीला सांगीतला. आजीने अर्जुनी मोर पोलिस स्टेशन गाठून त्याच दिवसी तक्रार दाखल केली. तक्रारीचे गांभीर्य ओळखून तत्कालीन सहायक पोलिस निरिक्षक संभाजी तागड यांनी आरोपी काल्याविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रकरण व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करून प्रकरण जलदगती न्यायालयात न्यायप्रविष्ठ केले. सरकारी अभियोक्ता महेश चंदवानी, सहायक सरकारी वकील कृष्णा पारधी यांनी पिडीतेची बाजू मांडली. यात 12 साक्ष नोंदविण्यात आल्या.murder accused साक्ष, पुरावे, वैद्यकीय अहवाल, इतर कागदोपत्री पुरावे आणि युक्तीवादानंतर विशेष व जलदगती न्यायालयाचे न्यायधीस के. एन. गौतम यांनी मंगळवार 30 रोजी आरोपी काल्या उर्फ प्रितम याला दोषी ठरवत 20 वर्षाचा कारावास, 5 हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा, दंड न भरल्यास 6 महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. सदर प्रकरण पोलिस अधिक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनात अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, पोलिस निरिक्षक कमलेश सोनटक्के यांच्या देखरेखीत पैरवी कर्मचारी तथा पोलिस हवालदार कृष्णकुमार अंबुले यांनी न्यालयीन कामकाजात सहकार्य केले.