पाकव्याप्त काश्मीर हादरला;शांततापूर्ण निदर्शकांवर थेट गोळीबार

    दिनांक :30-Sep-2025
Total Views |
मुझफ्फराबाद,
Pakistan-occupied Kashmir shaken पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये (पीओजेके) निदर्शनांना हिंसक वळण लागले असून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात किमान तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर डझनहून अधिक जण जखमी झाले आहेत. मीरपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या भागांमध्ये बंद आणि मोठ्या रॅल्या सुरू असून संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण आहे. संयुक्त अवामी कृती समितीच्या मागण्या पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरल्याने जनतेचा रोष भडकला आहे. निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर समितीचे अध्यक्ष शौकत नवाज मीर यांनी मुझफ्फराबाद येथून भाषण करत सरकारी संस्थांवर निदर्शकांना थेट लक्ष्य करण्याचा आरोप केला.
 

Pakistan-occupied Kashmir shaken
 
 
ते म्हणाले, या वेळेस सरकारने लोकांना संपवण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्याकडे राज्य प्रशासन, गुंड आणि दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचे पुरावे आहेत. पोलिस आमच्या बाजूने आहेत, Pakistan-occupied Kashmir shaken पण लोकांवर गोळ्या झाडल्या जात आहेत. मीर यांनी हेही आरोप केले की, राज्यात लोकांचा बळी घेतला जात असताना पाकिस्तानी माध्यमं खोट्या बातम्या पसरवून परिस्थिती लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)च्या युनिटने ऑनलाईन निदर्शनांना पाठिंबा दर्शवला असून अन्वर यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर “अक्षमता आणि दडपशाही”चा आरोप केला आहे.
 
पीटीआयने दावा केला की मुस्लिम परिषदेच्या गुंडांनी राज्याच्या संरक्षणाखाली शांततापूर्ण निदर्शकांवर थेट गोळीबार केला, ज्यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले. तसेच सरकार पुरस्कृत हिंसाचारामुळे निदर्शने विस्कळीत झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, प्रशासनाने प्लाक ब्रिज बंद केल्यामुळे रुग्ण आणि परदेशात प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याआधी लॉकडाऊनदरम्यान रुग्णांसाठी आणि प्रवासासाठी रस्ते खुले ठेवण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, अक्षम अन्वर सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे नागरिकांच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. पीओजेकेतील या घडामोडींमुळे संपूर्ण प्रदेशात संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.