तुषार भारतीय यांची घरवापसी

-भाजपातील निलंबन मागे -भाजपा प्रदेशाध्यक्षांनी दिले पत्र

    दिनांक :30-Sep-2025
Total Views |
अमरावती,
tushar bhartiyas महानगरपालिका स्थायी समिती माजी सभापती तथा माजी सभागृह नेते तुषार भारतीय यांचे भाजप मधील निलंबन मागे घेण्यात आले. मुंबई येथील भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सरचिटणीस संजय केणेकर, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये, नवनाथ बन यावेळी उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
 
 

तुषार भारती  
 
 
विद्यार्थी चळवळीतून आपल्या समाजसेवेची सुरुवात तुषार भारतीय यांनी केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तुषार भारतीय यांचे नेतृत्व फुलत गेलं. भाजपा विरोधी पक्षात असताना व वर्तमानात सुद्धा अनेक आंदोलने, विकासकामे व समाज उपयोगी कार्यक्रम सतत तुषार भारतीय यांच्याद्वारे अमरावती शहरांमध्ये राबविले गेले.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तुषार भारतीय यांचे भाजपात स्वागत करताना म्हटले की, आपल्या अनुभवी नेतृत्वाचा भाजपला मोठा उपयोग होणार आहे.tushar bhartiyas आगामी काळात अमरावती जिल्ह्यात भाजपची अधिक ताकद वाढेल, याची खात्री आहे. तुषार भारतीय यांचा पक्षातील निलंबन मागे हा फक्त एक राजकीय निर्णय नाही, तर निष्ठा, संयम आणि जनतेच्या विश्वासाचं यश आहे. आगामी काळात पक्षाच्या ध्येयधोरणानुसार, शिस्त पाळून आणि जनतेच्या अपेक्षांना केंद्रस्थानी ठेवून पूर्ण जोमाने कार्यरत राहाण्या करण्यासाठी शुभेच्छा देतो. यावेळी माजी महापौर चेतन गावंडे, प्रशांत शेगोकर, सचिन मोहोड, आकाश वाघमारे, राजेश जगताप प्रामुख्याने उपस्थित होते .
 
नेतृत्वाचा आभारी : तुषार भारतीय
आज भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाने माझ्यावर विश्वास दाखवला याबद्दल मी मनापासून आभारी आहे. भाजप हे माझे घरच आहे. यात पुन्हा सक्रिय झालो. माझ्या अमरावती जिल्ह्यामधील कार्यकर्ते, समर्थक आणि ज्यांनी कायम मला विश्वास दिला, त्यांच्या प्रेमामुळेच आज पुन्हा पक्षाच्या माध्यमातून लोकसेवेची संधी मिळत आहे.