नागपूर,
Vidarbha Level Elocution Competition महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबई व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिंदी विभागातर्फे सेवा पंधरवड्यांतर्गत विदर्भस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित झाली.स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी “शिक्षण आणि नैतिकता हीच राष्ट्रीय विकासाची गुरुकिल्ली” असल्याचे प्रतिपादन केले.
एकूण ५८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये व्हीएमव्ही कॉलेजची श्रेया शुक्ला हिने प्रथम क्रमांक, सारा सिंघवी हिने द्वितीय क्रमांक, तर ओम ढोक हिने तृतीय क्रमांक पटकावला.Vidarbha Level Elocution Competition विजेत्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्रे देण्यात आली.कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. मनोज पांडे होते. न्यायाधीश म्हणून डॉ. कविता जाधव, प्रा. कपिल सिंघल व डॉ. राजेश पशीने यांनी काम पाहिले.
सौजन्य:लखेश चंद्रवंशी,संपर्क मित्र