तभा वृत्तसेवा
पांढरकवडा,
teacher-death-penalty : उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कोचिंग क्लास चालविणारा शिक्षक संदेश गुंडेवार याला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी पांढरकवडा येथील पद्मशाली समाजबांधवांनी केली आहे.
पांढरकवडा येथील पद्मशाली समाजाने केळापूर उपविभागीय अधिकारी यांना सोमवार, 29 सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात आरोपी शिक्षक संदेश गुंडेवार यास कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, आरोपी शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्याशी अनैतिक संबंध स्थापित केले. पीडितेवर मानसिक दडपण आणून वारंवार अत्याचार करण्यात आले, त्यामुळे ती गर्भवती राहिली. बिंग फुटू नये म्हणून आरोपीने स्वतः औषध देऊन तिच्या गर्भपाताचा प्रयत्न केला. यात तिचा मृत्यू झाला.
या कृत्यामुळे समाजात संतापाची लाट उसळली असून आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी मागणी होत आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा आणि पीडितेला न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनात पद्मशाली समाजाने केली आहे.
यावेळी यवतमाळ जिल्हा पद्मशाली समाज अध्यक्ष सुभाष कुèहेवार, पांढरकवडा तालुका अध्यक्ष रेड्डीअण्णा बोधनवार, पद्मशाली चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष सुरेश बेतवार, पांढरकवडा शहराध्यक्ष प्रकाश मिंचेवार, गजानन गड्डमवार, अजय कामनवार, मार्कंडी बेतवार, शंकर गाजर्लावार, किशोर मोरेवार, अजय कोठेवार, स्वप्नील बल्लेवार, अशोक गुंजेवार, वासू मिटपेल्लीवार, प्रकाश बंडेवार, ईश्वर मिटपल्लीवार, गजानन बोमकंंटीवार, माधव मुळेवार, पुरुषोत्तम मिंचेवार, भारत बोमकंटीवार, उमेश पेंडमवार, प्रज्वल बोगावार, गणेश बेतवार, घनश्याम मिटपेल्लीवार, प्रवीण पेंडमवार, संजय मिटपेल्लीवार, महेश दासरवार, गजानन पेंडमवार, मनोज तालुकोकुलवार हजर होते.