तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
yavatmal-zilla-parishad : यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत दिव्यांग अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षक दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेतात. अशा कर्मचाèयांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोमवार, 29 सप्टेंबरपासून ही तपासणी होत आहे. काही कर्मचाèयांची आभासी नोंदणी नसल्याचे समोर आल्याने या बोगस दिव्यांगावर कारवाई होणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी व शिक्षक दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे बदली, सरळसेवा नियुक्ती, पदोन्नती, अतिरिक्त प्रवासभत्ता आदी बाबींचा लाभ घेतात. या दिव्यांगांबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेमार्फत तपासणी होत आहे.
पहिल्या दिवशी यवतमाळ जिल्ह्यातील 16 पैकी 8 तालुक्यांमधील दिव्यांग कर्मचाèयांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात आली. या जिल्हा परिषदेत 335 दिव्यांग अधिकारी, शिक्षक व कर्मचारी असून त्यातील 202 एकट्या शिक्षण विभागात आहेत.
तपासणीदरम्यान काही कर्मचाèयांजवळ आभासी प्रमाणपत्र नसल्याचे समोर आले आहे. अशा कर्मचाèयांची यादी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. या कर्मचाèयांवर कारवाईसुद्धा करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात हालचालींना वेग आला आहे. या तपासणीदरम्यान अशा कर्मचाèयांवर कधी कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.