बुलढाणा
Prataprao Jadhav फिलीपिन्समध्ये वैद्यकीय शिक्षण घेणार्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी नॅशनल मेडिकल कमिशन ने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. अभ्यासक्रमादरम्यान शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना अनिवार्य प्रत्यक्ष उपस्थितीची अट रद्द केली आहे. या निर्णयामुळे भारतातील ७ हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे या संदर्भात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून या संदर्भातील अधिसूचना नॅशनल मेडिकल कमिशनने निर्गमित केले आहे.
कोविड-१९ महामारीमुळे विदेशात वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना मायदेशी भारतात परताव लागले होते र्कोविड-१९ काळात आंतराष्ट्रीय प्रवासबंदी व आरोग्यविषयक कारणांमुळे जे विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गांना उपस्थित राहू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले होते यासंदर्भात विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी केंद्रीय आयुष ,आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या अडचणी बद्दल त्यांना अवगत करून दिले होते . मंत्री महोदय आणि त्यांच्या कार्यालयाच्यावतीने फिलीपिन्स आणि नॅशनल मेडिकल कमिशन कडे संपर्क साधण्यात आला . वस्तुस्थिती दर्शविण्यात आली गेल्या ६ महीन्यापासून सुरू असलेल्या पाठपुराव्यला अखेर यश आले आहे सन २०१९ -२००० मधील अभ्यासक्रमादरम्यान शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना अनिवार्य प्रत्यक्ष उपस्थितीची अट रद्द केली आहे. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. मात्र, अशा विद्यार्थ्यांना नियमानुसार एक वर्षाची अतिरिक्त इंटर्नशिप पूर्ण करावी लागणार आहे. या निर्णयाचा सुमारे ७,००० भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे . त्यांच्या पदवीची वैधता आणि भारतातील नोंदणीबाबत असलेली अनिश्चितता दूर होणार आहे. हा निर्णय कोविड १९ महामारीमुळे प्रभावित झालेल्या भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याला दिलासा देणारा असून, आवश्यक व्यावसायिक प्रशिक्षणाच्या अटी पूर्ण करत न्याय्य तोडगा काढणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. केंद्रीय आयुष, आरोग्य कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे .