नगराध्यक्षांची शहर स्वच्छतेतून कामाला सुरूवात

*सुधीर पांगुळ यांनी स्वीकारला पदभार

    दिनांक :01-Jan-2026
Total Views |
वर्धा, 
sudhir-pangul : सुमारे चार वर्षांनंतर शहराला नगराध्यक्ष मिळाला आहे. जनतेतून निवडून आलेले नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी १ जानेवारीला पदभार स्वीकारताच शहर स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करून कामाला सुरुवात केली. त्यांनी शहरातील विविध प्रभागांना भेटी देत नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
 
 
 
JH
 
 
 
नगर परिषदेमधील अटल बिहारी वाजपेयी सभागृहात नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांचा पदग्रहण समारंभ पार पडला. यावेळी मुख्याधिकारी विजय देशमुख यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, डॉ. अभ्युदय मेघे, उपमुख्याधिकारी अभिजीत मोटघरे आदींची उपस्थिती होती. नगर परिषदेत झालेल्या पदग्रहण समारंभासाठी नवनिर्वाचित नगरसेवकांनाही आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक पवन राऊत, वंदना भुते, शुभांगी कोलते, सतीश मिसाळ, राखी पांडे आदींनी उपस्थित राहून नगराध्यक्षांचे स्वागत केले.
 
 
कचर्‍याच्या ढिगार्‍यावरून व्यत केली नाराजी
 
 
पदभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी हवालदारपुरा येथील विठ्ठल-रुमिणी मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर मार्गावर दिसलेल्या कचर्‍याच्या ढिगार्‍याकडे पाहून त्यांनी पालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाशी संबंधित अधिकारी व ठेकेदारांबाबत नाराजी व्यत केली. शहरात कुठेही कचर्‍याचे ढिगारे दिसू नयेत, या दृष्टीने योग्य नियोजन करण्याचे स्पष्ट सूचना त्यांनी अधिकार्‍यांना दिल्या.