अमरावती,
amaravati-bjp-yuva-swabhiman महापालिका निवडणुकीसाठी भाजपा व युवा स्वाभिमान पार्टीत युतीवरून पहिलेपासूनच बेबनाव सुरू आहे. आता ही युती जवळपास तुटली आहे. भाजपाने युवा स्वाभिमानला दिलेल्या सहा जागांपैकी पाच जागांवर अपक्षांना अधिकृत पाठींबा जाहीर केला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शनिवारी अमरावतीत विविध ठिकाणी सभा होत्या. त्यांची पहिलीसभा वडाळी व बेनोडा प्रभागासाठी चपराशीपुरा येथे झाली. भाजपाने वडाळी प्रभागातील एकूण तीन जागांपैकी दोन जागा युवा स्वाभिमान पक्षासाठी सोडल्या होत्या. एका जागेवर आपला उमेदवार उभा केला होता. तेथील गौरी मंगेश सरवरे व अनिल सोनट्टके या दोन अपक्षांना भाजपाने पाठींबा दिल्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली.
(पाठींबा दिलेल्या वडाळीतल्या दोन उमेदवारांसह भाजपाचे अन्य उमेदवार)
amaravati-bjp-yuva-swabhiman युवा स्वाभिमान पक्षाने युतीत मिळालेल्या ६ जागे व्यतिरीक्त जवळपास ३५ उमेदवार विविध प्रभागात उभे केले होते. या उमेदवारांनी भाजपाला पाठींबा जाहीर करावा अशी सूचना युवा स्वाभिमानचे प्रमुख आमदार रवि राणा यांना भाजपाकडून करण्यात आली होती. त्यानुसार कृती झाली नाही. शेवटी भाजपाने युवा स्वाभिमानला दिलेल्या सहा जागांपैकी सुतगिरणी प्रगातील सुमती ढोके यांची एक जागा वगळता वडाळीतल्या गौरी सरवरे व अनिल सोनट्टके, बडनेरा जुनीवस्ती योगेश निमकर, गडगडेश्वर संतोष पिढेकर आणि राजापेठ अॅड. अर्पणा ठाकरे अशा पाच जागी अपक्षांना पाठींबा जाहीर केला. त्यामुळे भाजपा व युवा स्वाभिमान युती आता जवळपास संपुष्टात आली आहे. युवा स्वाभिमानपक्षाने एकूण ४१ उमदेवार रिंगणात उतरविले आहे. यातले बहुतांश उमेदवार बडनेरा मतदारसंघात येणार्या प्रभागांमध्ये आहे. झाालेल्या या राजकीय घडामोडीचा निवडणुकीच्या निकालावर काही परिणमा होतो का हे पाहावे लागेल.