मुंबई,
Archana Puran Singh बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना पुरण सिंग (Archana Puran Singh) तिच्या विनोदाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत गेली आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून ती गंभीर आजाराने ग्रासलेली आहे. खुद्द अर्चना हिच्या मुलाने, आयुष्मान पुरण सिंगने, आईच्या आरोग्याबाबत माहिती दिली.
माहितीनुसार, अर्चना हिला CRPS (Complex Regional Pain Syndrome) या दुर्मिळ आजाराने ग्रासले आहे, ज्यामुळे तिचा हात आता पूर्वीसारखा होणार नाही. मुलगा आयुष्मान म्हणाला, “मागचं वर्ष माझ्या आईसाठी फार कठीण वर्ष होतं. तिच्या हाताला फ्रॅक्चर झालं होतं आणि तिला या दुर्मिळ आजाराने ग्रासलं. मला माझ्या आईवर खूप गर्व आहे. तिने एवढ्या परिस्थितीतही 2–3 सिनेमांमध्ये काम केलं, एक वेब सीरिज शूट केली आणि एक महिना सलग 30 दिवस काम करत राहिली. तिने कधीही तक्रार केली नाही.”
अर्चना हिचा Archana Puran Singh मुलाकडून होणारा हा कौतुकाचा अनुभव ऐकून अभिनेत्रीच्या डोळ्यात भावनिक पाणी आलं. ६० व्या वर्षी तिने यूट्यूब चॅनल सुरू केला आणि नवीन प्रयोग करत राहिली, ज्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये तिची लोकप्रियता अजून वाढली आहे.अर्चना हिने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. ‘जलवा’, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘मोहब्बतें’, ‘कुछ कुछ होता है’ यांसारख्या सिनेमांमधील भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. टेलिव्हिजनवरही तिने ‘श्रीमान श्रीमती’, ‘जाने भी दो पारो’, ‘जुनून’ या मालिकांमध्ये दमदार कामगिरी केली.सोशल मीडियावर अर्चना सक्रिय आहे; ती चाहत्यांसोबत आपल्या रोजच्या जीवनातील फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. चाहत्यांनी तिच्या प्रत्येक पोस्टवर भरभरून प्रतिसाद दिला असून, अर्चना आणि तिच्या कुटुंबाच्या जीवनात प्रेक्षकांना सतत रुची राहते.