नागपूर भावसार क्षत्रिय समाज पंचकमेटीचा शताब्दी महोत्सव उद्या

    दिनांक :10-Jan-2026
Total Views |
नागपूर,
Bhavsar Kshatriya Samaj नागपूर भावसार क्षत्रिय समाज पंचकमेटीच्या स्थापनेला यंदा शंभर वर्षे पूर्ण होत असून, या ऐतिहासिक टप्प्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शताब्दी महोत्सवाचा समारोप सोहळा रविवार, ११ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. हा समारंभ दुपारी ३.३० वाजता भावसार सेलिब्रेशन सभागृह, हुडकेश्वर जुने पोलीस स्टेशन–पिपळा रोड, गोंडवाना चौक येथे होणार आहे. मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर सन १९२५ मध्ये समाज संघटनेची स्थापना करण्यात आली होती हे विशेष.

devi
 
या समारंभाचे अध्यक्ष म्हणून डॉ. रविंद्र शोभणे उपस्थित राहणार असून, उद्घाटक म्हणून पद्मश्री डॉ. विलासी डांगरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच देवराव फुलझेले, सोमनाथ वाधोणे आणि ॲड. सुभाष गोजे हे मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. Bhavsar Kshatriya Samaj नागपूर भावसार क्षत्रिय समाज पंचकमेटीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकारिणी मंडळाच्या वतीने समाजातील सर्व बांधवांना या ऐतिहासिक समारोप सोहळ्यास उपस्थित राहण्याचे सप्रेम आवाहन करण्यात आले आहे. समाजाच्या शताब्दी वर्षातील या महत्त्वपूर्ण क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी सर्वांनी साधावी, असे आवाहन राजेंद्र अंबारे व शेखर अलोणे यांनी केले आहे.