‘बिग बॉस मराठी सीझन ६’ ग्रँड प्रीमियर

    दिनांक :10-Jan-2026
Total Views |
मुंबई,
Bigg Boss Marathi Season 6 मराठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवणारा ‘बिग बॉस मराठी सीझन ६’ अखेर येत्या ११ जानेवारीपासून थेट घराघरांत पोहोचणार आहे. या भव्य ग्रँड प्रीमियरमध्ये प्रेक्षकांना पहिल्याच क्षणापासून भेटणार आहे मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीचा लोकप्रिय सुपरस्टार रितेश देशमुख. आपल्या खास स्टाइलमध्ये, विनोदाची फटकार आणि गरज पडल्यास कडक भूमिकेत दिसणारे रितेश देशमुख यंदाही बिग बॉसच्या घरातल्या खेळाला दिशा देणार आहेत.
 

Bigg Boss Marathi Season 6 
ग्रँड प्रीमियरमध्ये रितेश भाऊंच्या उपस्थितीत घरात कोणते स्पर्धक राडा घालायला सज्ज आहेत, हे काही तासांतच प्रेक्षकांसमोर येणार आहे. शोच्या प्रोमो मध्ये स्पर्धकांची झलक दिसताच सोशल मीडियावर उत्सुकतेचा पारा चढला आहे. या प्रोमोमधून काही सहभागींची दमदार एन्ट्री, सौंदर्य आणि अदा तसेच कातिल डान्स मूव्ह्ज पाहायला मिळाल्या, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये “हे सहभागी नेमके कोण?” अशी चर्चा रंगली आहे.अभिनेत्री अश्विनी महागंडे यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करून आपला अनुभव शेअर केला आहे, “मागील ३ दिवस जे माझ्यासोबत घडते आहे… हे का घडते..”, असे म्हणत त्यांनी चाहत्यांमध्ये उत्सुकता अधिकच वाढवली आहे.या वर्षीच्या सीझनमध्ये नवे पर्व, नवे खेळ आणि नवे चेहरे यामुळे शो प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. बिग बॉस मराठी सीझन ६ प्रेक्षकांना रात्री ८ वाजता कॉलर्स मराठीवर पाहायला मिळणार आहे, तसेच हा शो जिओ हॉटस्टारवरही उपलब्ध असेल.शोच्या ग्रँड प्रीमियरपूर्वीच प्रदर्शित झालेल्या प्रोमोनी प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवली असून, बिग बॉसच्या चाहत्यांमध्ये घरातील नाट्यमय घटनांसाठी उत्सुकता चरमावर आहे.