मुंबई,
Devendra Fadnavis महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगात टाकण्याचा कट रचण्यात आला होता, असा गंभीर आरोप मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. खोटे गुन्हे दाखल करून केवळ फडणवीसच नव्हे, तर आम्हालाही तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न झाला, असा दावा देखील राणे यांनी केला.
नितेश राणे म्हणाले की, Devendra Fadnavis सत्तेचा गैरवापर नेमका कसा केला जातो, याचे उदाहरण महाविकास आघाडीच्या कारभारात दिसून आले. देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रत्येक विरोधी पक्षातील नेत्याला खोट्या गुन्ह्यांत अडकवून जेलमध्ये टाकण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू होता. कोरोनाच्या भीषण काळात महाराष्ट्र अधोगतीकडे जात असताना उद्धव ठाकरे यांचा कारभार पूर्णपणे नियोजनशून्य होता. राज्यातील संकटांकडे दुर्लक्ष करून विरोधी पक्षातील नेते आणि राजकीय प्रतिस्पर्ध्यांना तुरुंगात टाकण्याचे काम त्या सरकारने केले. आता या सगळ्याचा बुरखा फाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार Devendra Fadnavis गटाने काही ठिकाणी शरद पवार गटासोबत युती केल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेवरही राणे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ही त्यांची अंतर्गत बाब असून पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी ते एकत्र आले आहेत. संयुक्तपणे महापालिका लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांनी एकत्र येऊन जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
याचवेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील Devendra Fadnavis शाळांबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना नितेश राणे म्हणाले की, जिल्ह्यातील एकही शाळा बंद होता कामा नये, यासाठी आपला आग्रह आहे. कोकणासाठी शिक्षणाच्या निकषांमध्ये वेगळेपण ठेवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी शिक्षणमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. मराठवाडा आणि विदर्भासाठी असलेले निकष कोकणाला लागू करू नयेत, यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.महायुतीच्या प्रचाराबाबत माहिती देताना राणे म्हणाले की, एकूण १२ सभा आयोजित करण्यात आल्या असून त्या महायुतीच्या प्रचारासाठी आहेत. महायुतीचा कार्यकर्ता म्हणून राज्यातील विविध भागांत जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.