जम्मू-काश्मीरमध्ये ड्रोनसह शस्त्रसाठा जप्त!

    दिनांक :10-Jan-2026
Total Views |
जम्मू,
Drone seized in Jammu जम्मू आणि काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानहून ड्रोनने आणलेले शस्त्रास्त्र जप्त करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीप्रमाणे, दोन पिस्तूल, तीन मॅगझिन, १६ काडतुसे आणि एक ग्रेनेड तसेच इतर संबंधित वस्तू यावेळी जप्त करण्यात आल्या आहेत. सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात अडथळा आणण्याचा दहशतवाद्यांचा कोणताही प्रयत्न रोखण्यासाठी परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. संशयास्पद ड्रोन हालचालींची माहिती मिळाल्यानंतर सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन्स ग्रुप (एसओजी) यांनी संयुक्त पथक तयार करून पालोरा गावात शोधमोहीम सुरू केली.
 
 

Drone seized in Jammu
शोध मोहीम दरम्यान नाल्याच्या काठावर पिवळ्या टेपने गुंडाळलेले एक पॅकेज आढळले. बॉम्ब निकामी पथकाच्या मदतीने ते पॅकेज उघडण्यात आले आणि आतून शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शोध मोहीम अद्याप सुरू आहे. दरम्यान, उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्ग सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळील उतारावरून घसरून दोन नागरी लष्करी पोर्टरचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, मृतांची ओळख लियाकत अहमद दिदार आणि इशाक अहमद खटाना अशी झाली आहे. पोर्टर गुरुवारी दुपारी पुढच्या भागातून घसरून नाल्यात पडले.
 
 
घटना समजताच, श्रीनगरस्थित १५ व्या कॉर्प्सच्या नियंत्रणाखाली येणाऱ्या गुलमर्ग सेक्टरमध्ये तातडीने बचाव मोहीम राबवली गेली. अपघातस्थळाजवळ असल्यामुळे शोधमोहीम जम्मू क्षेत्रातील पूंछ सेक्टरपर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. पूंछ सेक्टर लष्कराच्या नागरोटास्थित व्हाईट नाइट (१६) कॉर्प्सच्या अधिकारक्षेत्रात येतो. जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दल सतत सतर्क असून, आंतरराष्ट्रीय सीमेजवळील ड्रोन हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.