राष्ट्रीय महामार्गावर ‘गुरुकुंज मोझरी’चा उल्लेख

gurukunj-mozari-prahar प्रहारच्या डेरा आंदोलनाला यश

    दिनांक :10-Jan-2026
Total Views |
तिवसा, 
 
gurukunj-mozari-prahar राष्ट्रीय महामार्गावरील मुख्य दिशादर्शक फलकावर ‘गुरुकुंज मोझरी’ या पवित्र व ऐतिहासिक स्थळाचा उल्लेख करण्यात यावा, या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने छेडण्यात आलेल्या डेरा आंदोलनाला अखेर यश मिळाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या लेखी आदेशानंतर फलकावर गुरुकुंज मोझरीचे नाव स्पष्टपणे लावण्यात आले असून, त्यामुळे प्रवासी, भाविक तसेच स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
 
 
 

gurukunj-mozari-prahar 
(फलकावर असे गुरूकुंज मोझरी लिहण्यात आले आहे) 
 
gurukunj-mozari-prahar यापूर्वी दिशादर्शक फलकावर मोझरी/गुरुकुंज मोझरीचा उल्लेख नसल्याने बाहेरून येणार्‍या भाविकांमध्ये व वाहन चालकांमध्ये मोठ्या प्रमाणात नावाचा व दिशेचा गोंधळ निर्माण होत होता. परिणामी एस.टी. महामंडळाच्या बसेस, खासगी वाहने तसेच दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना अनावश्यक फेर्‍या माराव्या लागत होत्या. आता मात्र फलकावर स्पष्टपणे ‘गुरुकुंज मोझरी’ असा उल्लेख झाल्याने हा संभ्रम पूर्णतः दूर झाला असून प्रवास अधिक सुलभ व सुरक्षित झाला आहे.
 
 
gurukunj-mozari-prahar प्रहार संघटनेच्या ठाम भूमिकेमुळे आणि एनएचएआय कार्यालयात करण्यात आलेल्या ठिय्या व डेरा आंदोलनामुळे प्रशासनाला तातडीने निर्णय घ्यावा लागला. महाप्रबंधकांकडून लेखी आदेश मिळताच संबंधित कामाला गती देण्यात आली. यामुळे केवळ प्रहार कार्यकर्त्यांमध्येच नव्हे तर सर्वसामान्य प्रवासी, भाविक, विद्यार्थी व वाहनचालकांमध्येही दिलासा आणि समाधान व्यक्त होत आहे.
 
 
gurukunj-mozari-prahar प्रहार संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, हे आंदोलन केवळ एका नावापुरते मर्यादित नव्हते, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कर्मभूमीचा योग्य सन्मान राखण्यासाठी आणि लाखो भाविकांच्या सोयीसाठी करण्यात आले होते. आंदोलनाच्या यशानंतर प्रहार संघटना तसेच प्रवाशांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले असून, भविष्यातही जनहिताच्या प्रश्नांसाठी अशीच ठाम भूमिका घेतली जाईल, असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.