१५०० वर राज ठाकरेंचा डोळा!

    दिनांक :10-Jan-2026
Total Views |
नाशिक,
Raj Thackeray राज्य सरकार जात-धर्माच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करून मते मिळवत असल्याचा आरोप करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये सरकारवर जोरदार टीका केली. राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दिल्या जाणाऱ्या १५०० रुपयांवरून त्यांनी महागाईचा मुद्दा उपस्थित केला. सध्याच्या परिस्थितीत हे पैसे केवळ १५ दिवसही टिकत नसल्याचे सांगत, घरगुती गॅस सिलेंडरच १००० रुपयांपर्यंत पोहोचला असताना १५०० रुपयांत घरखर्च कसा भागणार, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
 

Raj Thackeray 

सरकारचा समाचार
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पार पडलेल्या प्रचार सभेत राज ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांच्या व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित होते. ठाकरे शैलीत सरकारचा समाचार घेताना राज ठाकरेंनी अशा योजनांना भुलून मतदान केल्यास त्याचे परिणाम भविष्यातील पिढ्यांना भोगावे लागतील, असा इशाराही दिला. “आज पैसे घेऊन मतदान केल्यास उद्या तुमचीच मुले म्हणतील, आमच्या आई-वडिलांनी पैसे घेतले, पण आमच्या शहराचा विकास झाला नाही, आमचं भविष्य घडवण्याचा कुणी विचार केला नाही,” असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
 
 
लाडकी बहीण योजनेच्या Raj Thackeray पैशांना भुलून महायुतीला मतदान करू नका, असे आवाहन करत त्यांनी मनसे-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांचे नगरसेवक निवडून देण्याचे आवाहन केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार-पाच वर्षे का पुढे ढकलण्यात आल्या, असा सवाल उपस्थित करत त्यांनी सत्ताधारी महायुतीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. १९५२ साली स्थापन झालेल्या पक्षाला २०२६ मध्येही दुसऱ्याची ‘पोरे दत्तक’ घ्यावी लागत आहेत, असा टोला लगावत त्यांनी भाजपवरही टीका केली.नाशिकमधील तपोवन परिसरातील वृक्षतोडीवरूनही राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला. “पूर्वीचा लाकूडतोड्या तरी प्रामाणिक होता. देवीने विचारले तरी त्याने सोन्याची किंवा चांदीची कुऱ्हाड असल्याचे मान्य केले नाही,” असा उपरोधिक टोला त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना लगावला. तपोवनातील झाडे छाटण्याआधीच इतर पक्षांतील कार्यकर्त्यांना ‘छाटले’ गेल्याचा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला.
 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Raj Thackeray  यांनी निवडणुकीच्या काळात नाशिकला दत्तक घेण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्यानंतर ते नाशिककडे फिरकलेच नाहीत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. नाशिककरांनी त्या आश्वासनांना भुलून आम्ही सत्तेत असताना केलेली कामे विसरली, असे सांगत राज ठाकरेंनी मतदारांना विचारपूर्वक निर्णय घेण्याचे आवाहन केले.राज ठाकरे यांच्या या भाषणामुळे नाशिकच्या राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली असून, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आक्रमक भूमिकेची चर्चा रंगू लागली आहे.