पार्ट-टू अनुभवण्यासाठी नागपूरकरांनो सज्ज व्हा

-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन -पूर्व व उत्तर नागपुरातील उमेदवारांसाठी जाहीर सभा

    दिनांक :10-Jan-2026
Total Views |
नागपूर,
union minister nitin gadkari जगात चांगले आहे, ते नागपुरात आले पाहिजे, यासाठी प्रयत्न आहे. शहराचा विकास करताना आम्ही कधीही भेदभाव करत नाही. नागपूरच्या जनतेचे जीवन सुसह्य करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. आतापर्यंत विकासाचा झाला, आता पार्ट-टू अनुभवण्यासाठी नागपूरकरांनी सज्ज व्हावे. सर्व मतदारांनी आता आपल्या मतांच्या रुपात महायुतीच्या उमेदवारांना नागपूरच्या विकासासाठी साथ द्यावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
वाठोडा, शांतीनगर, कळमना येथे सभा
 

गडकरी  
 
पूर्व नागपुरातील वाठोडा व शांतीनगर तसेच उत्तर नागपुरातील कळमना भागात प्रभाग ५, २१, १ व २ येथील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गडकरी यांच्या जाहीर सभा झाल्या. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार प्रा.अनिल सोले, संजय भेंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम, बंटी कुकडे, शारदा बारई, सीमा ढोमणे, चेतना निमजे, संतोष आंबुलकर, निशा भोयर, संजय अवचट, लक्ष्मी हत्तीठेले, अभिरुची राजगिरे, संजय चावरे, धनविजय, सुषमा चौधरी, प्रमिला मथरानी, विक्की कुकरेजा, डॉ. सरिता मिलींद माने, अनिकेत येरखेडे, नेहा निकोसे, पंकज यादव या उमेदवारांच्या प्रचारार्थ या सभा घेण्यात आल्या.
पारडीत ५० कोटीचे मार्केट
पारडी येथे लवकरच मोठे मार्केट तयार होणार आहे. त्यासाठी एनएचएआयकडून ५० कोटी रुपये दिले आहेत. मटण, मासोळी मार्केट उभारले जाणार आहे. नागपुरात विशेषतः वाठोडा आणि परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. भविष्यात नव्याने सोयीसुविधा याठिकाणी मिळणार आहे. शिक्षणाच्या सोयी सुविधांसह तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी अधिक मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
 
शांतीनगरच्या मैदानावर लाईट्स
शहराचा रिंग रोड आता सिमेंटचा झाला. भांडेवाडीत गरिबांसाठी चारशे खाटांचे रुग्णालय झाले. शांतीनगरच्या लाईट्स लावून दिले. रस्ते, वीज, पाणीच नाही तर सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्य सर्व सुविधा उपलब्ध झाल्या असून विकासाची अनेक कामे करण्यात आली आहे. शांतीनगरमध्ये पाण्याची समस्या आता राहिलेली नाही. भांडेवाडीमध्ये आता कचर्‍यापासून सीएनजी तयार होणार आहे. डम्पिंग यार्डच्या जागेवर मोठ्या शिक्षण संस्था आल्या आहेत. पूर्व नागपुरात दिव्यांग पार्क उभारण्यात आला
 
प्रत्येक भागात सिमेंटचे रस्ते
उत्तर नागपुरातील प्रत्येक भागात चांगले सिमेंटचे रस्ते झाले आहेत.union minister nitin gadkari पाण्याचा प्रश्न सुटला असून एकेकाळी या भागात पाण्याची टंचाई होती. आता परिस्थिती बदललेली आहे. शहराला चोवीस तास पाणीपुरवठा केल्या जात आहे. गोर गरिबांना हक्काचे घर दिल्या जात आहे. कळमनाचा रेल्वेचा उड्डाणपूल तयार झाला असून या भागातील प्रत्येक निवडणुकीत आम्हाला साथ दिली आहे, याबद्दल गडकरी यांनी आभार मानले.
...