मुलांमध्ये राष्ट्रभक्ती रुजायलाच हवी

राजाराम डोनारकर यांचे प्रतिपादन

    दिनांक :10-Jan-2026
Total Views |
नागपूर,
Rajaram Donarkar आजची मुले उद्याची नागरिक आहेत. यामुळे त्यांच्यात राष्ट्रभक्ती रुजायलाच हवी, असे प्रतिपादन प्रख्यात समाजसेवक राजाराम डोनारकर यांनी केले.
 

Patriotism among children, Rajaram Donarkar speech, 
केशवनगर सांस्कृतिक सभा यांच्या वतीने संघ शताब्दी निमित्त तसेच स्व. कृपा धाराशिवकर स्मृती प्रित्यर्थ पार पडलेल्या आंतर शालेय चित्रकला स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी किशोर धाराशिवकर, सचिव प्रशांत तुंगार, अनिल फेकरीकर, प्राचार्य मिलिंद भाकरे, धारणा खळतकर, योगेश बाराहाते, अमोल धारकर, संध्या अग्निहोत्री, स्वाती साखरे उपस्थित होते.
केशवनगर उच्च प्राथमिक Rajaram Donarkar शाळेतील इयत्ता 9 वीतील विद्यार्थिनी उदयानी विजया गजानन जिचकार या मुलीने उत्कृष्ट असे चित्र काढून पुरस्कारादाखल सायकल पटकावली. तिने गुढीपाडवा सण कुटुंबाने एकत्र येऊन नेमका कसा साजरा करावा, यावर काढलेल्या सुरेख चित्राला पहिला क्रमांक देण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते उदयानी जिचकार या मुलीला सायकल भेट स्वरूपात देण्यात आली.
 
 
याशिवाय चित्रकला स्पर्धेत विविध गटात उत्कृष्ट कामगिरी करणाèया मुला-मुलींना रोख पारितोषिक देत सन्मानित केल्या गेलेे. गट ड मध्ये नववर्ष (गुढीपाडवा) शुभेच्छा देणारे चित्र, पर्यावरण संरक्षण काळाची गरज आणि विज्ञानाची प्रगती आदी विषय मुलांना देण्यात आले होते. त्यावर आधारित चित्र त्यांना काढून रंगवायचे होते. यात उदयानी गजानन जिचकार हिने काढलेल्या चित्राला परिक्षकांनी दाद देत प्रथम क्रमांक दिला.
 
 
कार्यक्रमात राजाराम डोनारकर यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा’ या वाक्यावर तर मुलांनी जोरदार टाळ्या वाजवित त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत ‘भारत माता की जय’ या घोषणा दिल्याने वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. कार्यक्रमात अनिल फेकरीकर यांनी मोबाईलचा नोद सोडा मैदानावर खेळ खेळा असा संदेश मुलांना दिला. किशोर धाराशिवकर यांनी सर्व विजयी स्पर्धकांचे कौतुक करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.