तभा वृत्तसेवा
पुसद,
Pusad journalists honor, माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन, पुसद यांच्या वतीने पत्रकारदिनी गाडगेबाबा स्मृतीस्थळ पार्डी रोड निंबी येथे पुसद शहरातील 84 पत्रकारांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला. पत्रकार समाजाच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दत्तात्रय बापुराव जाधव, पंकज पाल, मराठा सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष दिगंबर जगताप, तहसीलदार रेखा मोहिते, पोलिस उपनिरीक्षक शेख मकसूद यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन यशवंत देशमुख यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पत्रकारांच्या निःस्वार्थ कार्याचे कौतुक करत समाज घडवण्यात पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत व्यक्त केले. तसेच पत्रकार कै. दिनेश देविदास खांडेकर यांना शद्धांजली अर्पण करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमानंतर Pusad journalists honor उपस्थित पत्रकार बांधव व मान्यवरांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन जाधव व सर्व पदाधिकाèयांनी परिश्रम घेतले.