नेरी मानकरमध्ये वातरोग चिकित्सा शिबिर

    दिनांक :10-Jan-2026
Total Views |
नागपूर,
Rheumatoid Medicine Camp नेरी मानकर येथे दत्ता मेघे आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीने आरोग्य वातरोग चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. आमदार समीर मेघे यांच्या मार्गदर्शनाखाली व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हर्षला राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर पार पडले.
 

Rheumatoid Medicine Camp 
 
या शिबिरात सुमारे ५० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. रक्तदाब व मधुमेह तपासणीनंतर आयुर्वेदिक उपचार व मार्गदर्शन देण्यात आले. आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. संतोष सूर्यकांत पुसदकर यांनी वातजन्य विकारांसह विविध आजारांवर उपचार करून आहार-विहाराबाबत मार्गदर्शन केले. Rheumatoid Medicine Camp महाविद्यालयातील विद्यार्थी व डॉक्टरांनी रुग्णसेवेत सहकार्य केले. ग्रामीण भागात आयुर्वेदिक उपचारांची उपयुक्तता वाढवणे व आरोग्यजागृती करणे हा शिबिराचा उद्देश असून नागरिकांनी उपक्रमाचे स्वागत केले.
सौजन्य: निकिता लुटे, संपर्क मित्र