विद्या भारतीतर्फे शिशु संगम साजरा

    दिनांक :10-Jan-2026
Total Views |
नागपूर,
Shishu Sangam विद्या भारती नागपूर महानगर तर्फे शुक्रवार, रेशिमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात शिशु संगम कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात नागपूर महानगरातील ११ शिशुवाटिकांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमास २५० पेक्षा अधिक विद्यार्थी तसेच सुमारे ५५० पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
Shishu Sangam
 
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक वंदनेने करण्यात आली. शिशु संगम २०२६ चा विषय “पर्यावरण” असल्याने सर्व शिशुवाटिकांतील बालकांनी पर्यावरण संवर्धनावर आधारित नृत्य व गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. Shishu Sangam वंदनेनंतर संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त बालकांनी प. पू. डॉ. हेडगेवार यांच्या जीवनावर आधारित सुंदर नाटुकलेचे प्रभावी सादरीकरण केले. त्यानंतर मुख्य कार्यक्रमास प्रारंभ झाला.
 
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भारतीय शिक्षण मंडळाच्या सदस्या समृद्धी शिरगावकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नागपूर महानगर अध्यक्ष श्रीकांत देशपांडे यांनी भूषविले. Shishu Sangam यावेळी निर्मला महाजन, प्रांजली जोशी व संध्या अग्निहोत्री यांचीही उपस्थिती लाभली.कार्यक्रमाची सांगता पारंपरिक शांती मंत्राने करण्यात आली. बालकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि पालकांची मोठ्या प्रमाणावर लाभलेली उपस्थिती यामुळे शिशु संगम कार्यक्रम अत्यंत यशस्वी व प्रेरणादायी ठरला.
 
सौजन्य: रणदीप बिसने, संपर्क मित्र