ओडिशाच्या राउरकेजवळ विमान कोसळले

    दिनांक :10-Jan-2026
Total Views |
राउरकेला,
The plane crashed near Rourkela. ओडिशातील राउरकेला जवळील परिसरात भुवनेश्वरहून राउरकेलाला जाणारे छोटे विमान कोसळले आहे. विमान नऊ आसनी ‘इंडिया वन एअर’ चे होते. त्यात एकूण सात जण होते असून यात सहा प्रवासी आणि एक पायलट होता. घटनेची माहिती मिळताच तातडीने बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आणि जखमी प्रवासी तसेच पायलट त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रशासनाने परिस्थितीवर त्वरित नियंत्रण ठेवले असून, सुरक्षा व्यवस्था आणि मदत कार्य सुरू आहे.
 
 
plane crashed near Rourkela
 
वर्तमानात विमान अपघाताचे कारण अद्याप अज्ञात असून, नेमकी परिस्थिती आणि अपघात कसा झाला याचा तपास संबंधित विभाग करत आहे. राउरकेलापासून सुमारे १०-१५ किलोमीटर अंतरावर विमान कोसळल्याचे समजते. भुवनेश्वरहून पर्यटन विभागाचे प्रतिनिधी आणि इतर संबंधित पथक घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. सुरक्षाबळांनी घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य यशस्वीपणे पार पाडले. इतक्या मोठ्या अपघातात सर्व प्रवासी आणि पायलटांचा जीव सुरक्षित राहणे हे प्रत्यक्षात चमत्कारिक आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक प्रशासनाने व्यक्त केली आहे.