शंकरनगरमध्ये प्रकृतीवंदन कार्यक्रम

    दिनांक :11-Jan-2026
Total Views |
नागपूर,
Shankarnagar पर्यावरण संरक्षण व संवर्धन समिती, शंकरनगर यांच्या पुढाकाराने पर्यावरण गतिविधीच्या माध्यमातून आज सकाळी ९:०० वाजता श्री हनुमान मंदिर, शंकरनगर परिसरात प्रकृतीवंदन कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमात पर्यावरण संशोधक डॉ. राजकुमार खापेकर यांनी उपस्थितांना पर्यावरणाशी संबंधित प्राचीन काळापासून ते आजच्या वर्तमान परिस्थितीपर्यंत सखोल व बहुमूल्य माहिती दिली. झाडे, पाणी आणि पॉलिथीन या विषयांकडे गांभीर्याने पाहून त्यावर कृतिशील भूमिका घेण्याचे आवाहन त्यांनी केले. दैनंदिन जीवनात छोट्या-छोट्या उपाययोजना केल्यास सध्याची पर्यावरणीय स्थिती सुधारण्यास निश्चितच मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
 
Shankarnagar
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध व्यावसायिक चारूदत्त सावजी होते. तर पर्यावरण गतिविधीचे नागपूर महानगर संयोजक नेताजी चिंचुलकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. खापेकर यांचे स्वागत रमेश कानिटकर यांनी केले, तर अध्यक्षांचे स्वागत फ्ला. लेफ्टनंट (निवृत्त) भोयर यांनी केले. Shankarnagar आभार प्रदर्शन रवि झाडे (व्यावसायिक) यांनी केले. यावेळी निरंजन कायंदे यांनी उपस्थितांना पर्यावरण संरक्षण व संवर्धनाची शपथ दिली. कार्यक्रमस्थळी रांगोळी व सुशोभीकरण प्रियंका गडकरी यांनी अत्यंत आकर्षक पद्धतीने साकारले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मंचसंचालन समितीच्या संयोजकांनी केले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी जलपानाची व्यवस्था करण्यात आली होती.
सौजन्य: महेश मोलकर, संपर्क मित्र