हिंगणघाट,
Vitthal Danav येथील तबलावादक विठ्ठल दानव यांची प्रसार भारती आकाशवाणी नागपूर केंद्राच्या वतीने तबला (सुगम संगीत) वादन परीक्षणात आकाशवाणीचे बी श्रेणीचे अधिकृत कलावंत म्हणून निवड करण्यात आली.
अगदी लहानपणापासून आई-वडील, गुरुजनांचा आशीर्वाद, तबला वादनातील अविरत साधना, आकाशाला गवसणी घालण्याची दुर्दम्य इच्छाशतीच्या बळावर तबल्यावरील थिरकरणार्या बोटांनी हिंगणघाट नगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून संपूर्ण तालुयातून विठ्ठल दानव यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑटोबर २०२५ तबला वादनातील ताल परीक्षण (सुगम संगीत) घेण्यात आले होते. या निवड परीक्षणात विठ्ठल दानव यांनी सादर केलेल्या सुगम संगीतातील नजाकत पूर्ण तबला वादनाची दखल घेत आकाशवाणीवरील दिग्गज परीक्षकांनी त्यांना यशस्वी घोषित करून आकाशवाणीचे प्राविण्य प्राप्त बी श्रेणी कलावंत म्हणून त्यांची निवड केली. या श्रेणीमुळे आता त्यांना शासकीय स्तरावरील तबलावादनातील कलावंत म्हणून मान्यता मिळाली असून, लवकरच आकाशवाणीवरून त्यांच्या तबलावादनाचे कार्यक्रम प्रसारित होणार आहे.
याच शहरातील एका खर्या कलावंताने आपल्या अविरत साधनेच्या बळावर मंदिरातल्या भजनापासून सुरू केलेल्या तबल्यावरील बोटांचा प्रवास आता आकाशवाणीवरील दिग्गज कलावंतांच्या संगतीवर थिरकणार आहे. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.