वरूडात काँग्रेसचा गट भाजपात विलीन

राजकीय वर्तुळात खळबळ

    दिनांक :11-Jan-2026
Total Views |
वरूड, 
warud-congress-bjp : नुकत्याच पार पडलेल्या वरूड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचे १८ , राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प) गटाचे ४, राष्ट्रीय काँग्रेस २, प्रहार १, अपक्ष १ सदस्य असे संख्याबळ असताना अपक्ष व प्रहारच्या नगरसेवकांनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे भाजपाचे संख्याबळ २० वर गेले व या संख्या बळाच्या आधारे भाजपाने दोन स्विकृत सदस्य सभागृहात पाठवण्यासोबतच तिसर्‍या सदस्याकरिता आगळीवेगळी खेळी भाजपाकडून खेळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
 
 
j
 
काँग्रेसचे २ व राष्ट्रवादीचे ४ नगरसेवक असे दोन पक्ष मिळून अधिकृतरित्या वेगवेगळे दोन गट जिल्हाधिकार्‍यांच्या साक्षरीने स्थापन करण्यात आले होते. परंतु, भाजपाचे तिन स्विकृत सदस्य सभागृहात पाठवण्याकरिता काँग्रेसच्या गटातील २ सदस्यांचे भाजपात विलनीकरण करून भाजपाने २२ सदस्यांचा आकडा गाठला आहे. नगराध्यक्ष भाजपाचा असल्याने दोन मते पिठासीन अधिकार्‍याचे या नियमानुसार वापरून हा आकडा २४ वर पोहचल्याने आता भाजपाला ३ स्विकृत सदस्यांचा आकडा सहज गाठणे सोपे झाले आहे. त्यामुळे ४ सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक स्विकृत सदस्य सभागृहात पाठवण्या आधीच रोखण्यात भाजपाला यश आले आहे.
 
 
वरूड नगरपरिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ११ मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे न.प.सदस्य तथा गटनेते निसार मोहम्मद शौकत व भाग्यश्री निलेश अधव या विजयी झाल्या. त्यांनतर त्यांनी सादर केलेल्या पत्रानुसार ३१ डिसेंबर रोजी काँग्रेसच्या दोन्ही सदस्यांनी एकत्रित येत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या स्वाक्षरीने दोन स्दस्यीय गट स्थापन केला. परंतु, हा गट रद्द करण्यासाठी ५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आले. भाजपाचे गटनेते किरण नानाराव सावरकर यांना जिल्हाधिकार्‍यांनी पाठवलेल्या पत्रानुसार ६ जानेवारी रोजी भाजपाच्या गटात काँग्रेसकडून दोन स्दस्यीय गट विलीन करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपाकडे २२ सदस्यांचे संख्याबळ झाले आहे. या विलनीकरणावरून माजी आ. देवेंद्र भुयार यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर निशाण साधत जिल्ह्यासह स्थानिक नेत्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. शाहु, फुले, आंबेडकर विचारधार्‍याच्या मतदारांनी काँग्रेसच्या सदस्यांना मते दिली आहे, त्यांचे विचार पायाखाली तुडवण्याचे काम काँग्रेसच्या नेत्यांनी केले आहे.