बॅंक कर्मचारी ते दुचाकी चोर: 63 दुचाकी चाेरीचा 'पर्दाफाश'

वाहनचाेराकडून चाेरीची 27 वाहने जप्त

    दिनांक :11-Jan-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,

bike thief, 63 motorcycles stolen एका नामांकित बँकेत कर्मचारी म्हणून कार्यरत असताना माैजमजा करण्यासाठी पैसे उडविण्याची सवय जडली. शाैक पूर्ण करण्यासाठी त्या कर्मचाèयाने बँकेत पैशांचा गैरव्यवहार केला. मात्र, सापडल्या गेल्याने त्याची नाेकरी गेली. त्यामुळे त्याने थेट दुचाकी चाेरीचा मार्ग पत्करला. तब्बल 63 दुचाकी चाेरून विक्री करुन माैजमजा केल्यानंतर ताे गुन्हे शाखेच्या हाती सापडला. चाेराला शहर गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने अटक करून त्याच्या ताब्यातून 16 लाख 50 हजाराची 27 दुचाकी जप्त केल्या. या चाेरट्याने आतापर्यंत 63 दुचाकी चाेरल्याची कबुली दिली.राहुल सुखचंद खापरे उफर् ठाकरे (43) सातनेर, जि. बैतूल (मध्यप्रदेश) असे या वाहनचाेराचे नाव आहे.
 
 
bike thief, 63 motorcycles stolen
 
 
पाच वर्षांपूर्वी राहुल हा एका खाजगी बँकेत एजंट म्हणून काम करायचा. बँकेत त्याने पैशाचा घाेळ केला आणि त्याला नाेकरी गमवावी लागली. बँकेचे नुकसान भरून काढण्यासाठी ताे वाहनांची चाेरी करू लागला. त्यानंतर ताे नागपूरला आला. नागपुरात ताे मिनी मातानगरातील पाच झाेपडा परिसरात भाड्याने राहात हाेता. काही दिवस त्याने भाजीपाल्याचा धंदा केला. परंतु, या धंद्यात त्याचे मन रमले नाही. पुन्हा ताे वाहनचाेरी करू लागला. आठवडी बाजारातून ताे वाहने चाेरी करीत असे. वाहन चाेरल्यानंतर ताे मध्य प्रदेशात घेऊन जात असे. तेथे ताे 5 ते 10 हजारांत त्या वाहनांची विक्री करीत असे. शहरात सातत्याने वाहन चाेरीच्या घटना वाढत असल्याने युनिट 1 च्या पथकाने या वाहनचाेराकडे आपले लक्ष केंद्रीत केले. ज्या ठिकाणाहून वाहन चाेरीला गेले तेथील सीसीटीव्ही ुटेज आणि जुन्या वाहनचाेरांची कार्यपद्धती याचा अभ्यास केला. त्यात राहुलचे नाव समाेर आले. त्यामुळे पाेलिस राहुलच्या मागे लागले.
 
 
पाेलिसांचे एक पथक त्याच्या गावी रवाना झाले. मात्र, ताे घरी सापडला नाही. तीन दिवस पाेलिस त्याच्या गावी पाळतीवर हाेते. शेवटी पाेलिसांनी त्याला आपल्या जाळ्यात ओढले. त्याला नागपूरला आणून त्याची सखाेल चाैकशी केली असता त्याने वाहनचाेरी केल्याची कबुली दिली. पाेलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदाेडकर, एपीआय जाधव, सचिन भांडे, पाेलिस उपनिरीक्षक ओमप्रकाश काेठे, नितीन वासनिक, हेमंत लाेणारे, रवी अहीर, सुनील गुजर, शरद चांभारे, सुशांत साेळंके व त्यांच्या सहकाèयांनी ही कारवाई केली.
 
 
हे आहेत दुचाकी चाेरीचे स्पाॅट
 
 
आराेपी राहुलने एमआयडीसी, काेराडी, हुडकेश्वर, कपिलनगर, खापरखेडा, गणेशपेठ, वाडी, कळमना, पारडी, माैदा येथून प्रत्येकी 1, बेलतराेडी 3, वाठाेडा 3 आणि अमरावती जिल्ह्यातील परतवाडा, बेनाेडा, वरूड आणि शिरजगाव येथून वाहने चाेरली हाेती. पाेलिसांनी त्याचा गुन्हेगारी अभिलेख तपासला असता त्याने यापूर्वी, नागपूर शहर व ग्रामीण, वर्धा, भंडारा, अमरावती ग्रामीण आणि मध्य प्रदेशात देखील वाहने केल्याचे लक्षात आले. त्याच्यावर 63 गुन्हे दाखल असल्याचे पाेलिसांना समजले.