भाऊसाहेबांचा तिर्थस्थान उपक्रम

    दिनांक :11-Jan-2026
Total Views |
नागपूर,
Bhausaheb तिर्थस्थान म्हणजे पवित्र स्थान जे मानवी जीवनाला मार्गदर्शन आणि प्रेरणा देते. भाऊसाहेब भोरे यांनी ग्रामीण भागात, कठीण परिस्थितीत असूनही, ज्ञानार्जनासाठी एक तिर्थस्थान उभारले. त्यांच्या कार्यामुळे अनेक लोकांना जीवनात नवी दिशा मिळाली, असे गौरवद्गार श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे जेष्ठ प्रचारक ज्ञानेश्वर रक्षक यांनी सांगितले.
 
nagpur
 
शिक्षणाची गंगा शिवशक्ती शिक्षण संस्था (वेणीकोठा, ता. कळंब, जि. यवतमाळ) या संस्थेच्या माध्यमातून भाऊसाहेब भोरे यांनी गरीबांच्या झोपडय़ांपर्यंत शिक्षण पोहचवले. त्यांच्या कार्याचा आदर म्हणून त्यांच्या पुतळ्याचे अनावरण प्रबोधन समारंभात करण्यात आले. Bhausaheb या वेळी उपस्थित होते: ज्ञानेश्वर रक्षक, आमदार बाळासाहेब मंगरूळकर, संस्थेचे प्रमुख बाळासाहेब धांदे, वारकरी किर्तनकार शिवलिलाताई पाटील, राष्ट्रीय प्रबोधनकार मोहनदादा चोरे यांसह अनेक मान्यवर. हा समारंभ लोकसहभागात पार पडला आणि वाढदिवसाच्या निमित्ताने हा अनुभव उपस्थितांसाठी एक अनोखी भेट ठरला.
सौजन्य: दुर्गादास रक्षक, संपर्क मित्र