भाजपाच्या कार्यकाळात नागपूरचा पूर्णत: कायापालट

आता सर्वोत्तम शहराची होणार

    दिनांक :11-Jan-2026
Total Views |
नागपूर

BJP Nagpur development महापालिकेतील भाजपच्या गत २० वर्षांच्या संपूर्ण नागपूर शहरात विकासाची अनेक कामे चहुबाजूने झाली आहे. भाजपने २०१७ मध्ये जे वचन दिले. ती सर्व विकासाची कामे पूर्ण करण्यात यश मिळाले आले. नागरिकांना चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी नव्या पाईप लाइन्स टाकण्यात आल्या आहेत. आगामी काळात २४ बाय ७ योजनेंतर्गत संपूर्ण शहरात २४ तास पाणीपुरवठा देण्यात येईल. नागपुरात विदेशी दूतावास, मेट्रोच्या तिसर्‍या टप्प्याचा संकल्प करण्यात आल्याने क्रमांक एकचे सर्वोत्तम शहर होईल, असा विश्वास भाजपा शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.
 

BJP Nagpur development 
रामदासपेठ येथील हॉटेल तुली इम्पेरिअलमध्ये जाहिरनामा प्रकाशित करण्यात आला. याप्रसंगी महसूलमंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, आमदार परिणय फुके, माजी आमदार प्रा. अनिल सोले,माजी सुधाकर कोहळे, गिरीश व्यास, डॉ.मिलिंद माने, डॉ. विकास महात्मे, निवडणूक प्रमुख संजय भेंडे, माजी महापौर नंदा जिचकार आदींची उपस्थिती होती.
 
 

प्रत्येक प्रभागाात मैदानाचा विकास
 
 
भाजपा शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी जाहिरनाम्यातील वैशिष्ट सांगताना पुढे म्हणाले, शहरातील ६० हजार झोपडपट्टीवासींना पट्टे वाटप, मलजल नि:स्सारण योजनेच्या कामांना गती, पाकिस्तानातील सिंध प्रांतातून सिंधी मालकी पट्टे, जलकुंभाची बांधणी, तलावांचे संवर्धन व सौंदर्यीकरण, उद्यान, प्रत्येक प्रभागाात मैदानाचा विकास, सिमेंट रस्ते, कचर्‍यावर प्रक्रिया आदींमुळे नागपूरचा चेहरामोहरा बदललेला आहे. झालेली अनेक विकास कामे प्रत्यक्षात दिसून येत आहे. सर्वात कमी वेळात मेट्रो सुरु केल्याने उत्तम वाहतूकीची सुविधा नागपूरकांना मिळाली आहे. सध्याच्या घडीला दुसर्‍या टप्प्याचे काम सुरु असून टप्प्याचे नियोजन केल्या जात आहे. भाजपने खर्‍या अर्थाने नागपूर शहराचा कायापालट करुन दाखविला आहे.