खळबळजनक ! फोरमन इनचार्ज जैस्वालला लाच घेताना अटक

नागपूर सीबीआयची कारवाई

    दिनांक :11-Jan-2026
Total Views |
अनिल कांबळे


नागपूर,
Deepak Jaiswal वेस्टर्न काेलिफल्ड्स लिमिटेड (वेकाेलि) अंतर्गत येणाèया नीलजाई सब एरिया येथील नायगाव ओपन कास्ट खाणीत कार्यरत फोरमन इनचार्ज दीपक जैस्वाल याला केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने (एसीबी) लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. ही कारवाई सीबीआयचे प्रमुख ऋषिकेश साेनवणे यांच्या मार्गदर्शनात शनिवारी करण्यात आली.
 

Deepak Jaiswal 
 
 
आराेपी दीपक जैस्वाल हा नायगाव क्षेत्राचा प्रमुख आहे. त्याच्या अंतर्गत दाेन कर्मचाèयांचा परस्पर बदली प्रस्ताव मंजूर करून देण्यासाठी लाच मागितल्याचा आराेप आहे. यातील एक कर्मचारी तक्रारदाराचा नातेवाईक असल्याचेही समाेर आले आहे. सीबीआयकडे 9 जानेवारीला प्राप्त झालेल्या लेखी तक्रारीनुसार, आराेपी दीपक जैस्वाल यांनी एकूण 50 हजार रुपयांची लाच मागितली हाेती. प्रत्येक कर्मचाèयासाठी 25 हजार रुपये अशी ही मागणी हाेती. तक्रारदारही वेकाेलिचाच कर्मचारी आहे. लाच मागणीची खातरजमा स्वतंत्र साक्षीदारांच्या उपस्थितीत करण्यात आली. या पडताळणीदरम्यान झालेल्या चर्चेत आराेपी जैस्वालने लाचेची रक्कम कमी करून 40 हजार रुपये, म्हणजे प्रत्येकी 20 हजार रुपये अशी ठरवली. त्यानंतर सीबीआयने सापळा रचण्याचा निर्णय घेतला. 10 जानेवारी 2026 राेजी स्वतंत्र साक्षीदारांच्या उपस्थितीत सापळा लावण्यात आला. या कारवाईदरम्यान दीपक जैस्वाल याने तक्रारदाराकडून 40 हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताच सीबीआयच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. या कारवाईमुळे वेकाेलितील कर्मचाèयांमध्ये खळबळ उडाली असून सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आराेपीविराेधात पुढील तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी काेणाचा सहभाग आहे का, याचा तपास सीबीआयकडून करण्यात येत आहे.
 
 
भ्रष्टाचाराची तक्रार करा
केंद्र सरकारच्या काेणत्याही विभागातील किंवा उपक्रमातील (आयकर विभाग, सीजीएसटी, सीमाशुल्क, वेकाेली, आयबीएम, पेसाे, माॅईल, एफसीआय, बीएसएनएल, भारतीय रेल्वे, बँका, केंद्रीय शैक्षणिक संस्था, पाेस्ट ऑिफस इ.) काेणताही अधिकारी किंवा कर्मचारी लाच मागत असेल, तर सीबीआयने नागपूरच्या एसीबीला माेबाईल क्रमांक 9423683211 किंवा दूरध्वनी क्रमांक 0712-2510382 वर तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.