बोगोटा,
charter-plane-crashed-in-colombia कोलंबियातील बोगोटा येथे एका चार्टर विमानाला अपघात झाला, त्यात सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लोकप्रिय कोलंबियन गायक आणि गीतकार येइसन जिमेनेझ यांचाही समावेश आहे. यामुळे जिमेनेझच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. जिमेनेझच्या अपघातात झालेल्या मृत्यूमुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर श्रद्धांजलीचा वर्षाव होत आहे, चाहत्यांनी भावनिक संदेश पोस्ट केले आहेत. हा अपघात कोलंबियाच्या बोयाका राज्यात झाला.
अपघाताच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की जुआन जोसे रोंडोन विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर चार्टर विमान उंची गाठू शकले नाही आणि शेवटी धावपट्टीजवळील एका शेतात कोसळले. घटनास्थळावरील व्हिडिओमध्ये लहान विमानाचे अवशेष आगीच्या ज्वाळांनी वेढलेले दिसत आहेत. charter-plane-crashed-in-colombia ही घटना बोयाकामधील पैपा आणि दुइतामा दरम्यानच्या भागात घडली. अधिकाऱ्यांनी सांगितले की जिमेनेझ आणि पायलटसह एकूण सहा जण विमानात होते. अपघातात मृत्युमुखी पडलेले इतर चार लोक जिमेनेझच्या टीमचे सदस्य होते.
सौजन्य : सोशल मीडिया
जिमेनेझ बोयाका येथे सादरीकरण करत होते आणि ते खाजगी विमानाने मेडेलिन विमानतळावर मारिनिला येथील एका संगीत कार्यक्रमासाठी जात होते. येसेन जिमेनेझचा विमान अपघातात मृत्युमुखी पडल्याच्या बातमीने त्याचे चाहते खूप दुःखी झाले आहेत आणि ते सोशल मीडियावर भावनिक पोस्ट टाकत आहेत. charter-plane-crashed-in-colombia एका व्यक्तीने म्हटले आहे की त्यांच्या मृत्यूने माझे हृदय पिळवटून टाकले आहे, तर दुसऱ्याने लिहिले आहे की, "येसेन जिमेनेझने अनेकदा विमान अपघातात मरण्याचे स्वप्न पाहिले होते आणि आज त्यांचा पाच जणांसह विमान अपघातात मृत्यू झाला. हे खूप दुःखद आहे."