मुंबई,
devendra fadnavis आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेना-रिपाई यांची महायुतीने महिला मतदारांना लक्षात ठेवून आपला वचननामा जाहीर केला आहे. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी महायुतीने तीन महत्त्वाच्या घोषणांची प्रतिज्ञा केली आहे. या घोषणांमुळे मुंबईतील महिलांचा प्रवास सुलभ होईल तसेच त्यांना उद्योजकतेकडे वाटचाल करण्यास मदत होईल, असा दावा महायुतीने केला आहे.
महिलांसाठी ५० टक्के प्रवास सवलत
महायुतीच्या वचननाम्यातील devendra fadnavis पहिली महत्त्वाची घोषणा म्हणजे मुंबईच्या जीवनवाहिनी असलेल्या ‘बेस्ट’ बस सेवेत महिलांसाठी ५० टक्के प्रवास सवलत. प्रवाशांच्या सोयीसाठी बसांची संख्या सध्या ५,००० असून ती १०,००० पर्यंत वाढवण्यात येईल. प्रत्येक बस थांब्यावर सीसीटीव्ही कॅमेरे, डिजिटल डिस्प्ले आणि वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, जे प्रवास सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे.महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने महायुतीने बिनव्याजी कर्ज योजना जाहीर केली आहे. लाडक्या बहिणींना स्वतःचा लघु उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी पाच लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. याशिवाय, कोळी भगिनींसाठी मासळी बाजारात आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासह कोल्ड स्टोरेजची सुविधाही दिली जाईल, जेणेकरून स्थानिक उद्योजिकांना व्यवसाय सुलभ होईल.महिलांचे आरोग्य आणि सुरक्षा देखील वचननाम्यात विशेष लक्षात घेण्यात आले आहे. मुली आणि स्त्रियांसाठी गर्भाशयाचा कर्करोग आणि स्तनांचा कर्करोग तपासणी महापालिकेद्वारे मोफत करण्यात येणार आहे. तसेच, रात्रीच्या वेळी महिलांना सुरक्षित वाटण्यासाठी सामसूम वाटणाऱ्या भागात आणि पदपथांवर दिव्यांची संख्या वाढवण्यात येईल.
लघुउद्योग वाढवणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis यांनी या घोषणांचा खुलासा करताना सांगितले की, मागील निवडणुकीत १ लाख रुपयांपर्यंतचा लघुउद्योग कर्जाचा लाभ दिला गेला होता, परंतु आता हा मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यांनी उल्लेख केला की, महापालिकेत पारदर्शकता आणण्यासाठी बिल्डिंग प्लानमध्ये एआयचा वापर केला जाईल. डीसीआर, डीपी आणि जिओ स्पेशल डेटाचा आधार घेऊन एआय मॉडेल दोष दाखवेल, बदल सुचवेल, अशा प्रकारे अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्थापनाची सुरुवात केली जाईल.महायुतीच्या या घोषणांमुळे मुंबईतील महिला मतदारांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रवास, आरोग्य आणि आर्थिक स्वावलंबन या तीन प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून महायुतीने महिलांना निवडणूक काळात आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
जाहीरनाम्यातील मुख्य घोषणा
३५ लाख घरांची निर्मिती : मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसाला पुन्हा शहरात आणण्यासाठी पुढील ५ वर्षांत ३० ते ३५ लाख घरांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
पागडीमुक्त मुंबई : मुंबईतील जुन्या इमारतींमधील ‘पागडी’ पद्धत बंद करून भाडेकरूंना मालकी हक्काची घरे मिळवून दिली जातील.
२० हजार इमारतींना OC : विविध कारणांमुळे भोगवटा प्रमाणपत्र (OC) रखडलेल्या २० हजार इमारतींना तात्काळ OC वितरित केले जाईल.
सफाई कामगार आणि पोलिसांसाठी घरे: सफाई कामगारांना हक्काची घरे दिली जातील आणि पोलिसांच्या जीर्ण घरांच्या पुनर्विकासाला प्राधान्य दिले जाईल.
खड्डेमुक्त मुंबई : ९ मीटरपेक्षा जास्त रुंदीचे सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे (CC) केले जातील. रस्ते वारंवार खणले जाऊ नयेत म्हणून १७ नागरी सेवांसाठी ‘यूटिलिटी टनेल’ (Utility Tunnel) बनवण्यात येतील.
महिलांना बस प्रवासात सवलत : ‘बेस्ट’ बसच्या प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत दिली जाईल
बेस्टचा विस्तार : २०२९ पर्यंत बेस्टच्या ताफ्यात १०,००० इलेक्ट्रिक बसेस समाविष्ट केल्या जातील.
पाणीपट्टी वाढीला स्थगिती : दरवर्षी होणारी ८ टक्के पाणी दरवाढ पुढील ५ वर्षांसाठी स्थगित केली जाईल.
मोफत आरोग्य तपासणी : ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना पालिकेच्या रुग्णालयांत वर्षातून एकदा मोफत फुल बॉडी चेकअपची सुविधा मिळेल.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना : प्रत्येक वॉर्डमध्ये ३०-४० प्रकारच्या रक्त चाचण्या आणि औषधे मोफत देणारी केंद्रे पूर्णपणे कार्यक्षम केली जातील.
पूरमुक्त मुंबई : आयआयटी (IIT) सारख्या संस्थांच्या मदतीने जपानी तंत्रज्ञान वापरून मुंबईला ५ वर्षांत पूर्णपणे पूरमुक्त (Flood-free) करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
मागेल त्याला शौचालय : झोपडपट्टी भागात स्वच्छता सुधारण्यासाठी ‘मागेल त्याला शौचालय’ हे धोरण राबवले जाईल.
बांगलादेशी व रोहिंग्या मुक्त अभियान: मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना बाहेर काढून मुंबई पूर्णपणे घुसखोरमुक्त करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
भ्रष्टाचारमुक्त पालिकेसाठी AI तंत्रज्ञान : महानगरपालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI) तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
कंत्राटदारांचे सक्तीचे पडताळणी: पालिकेच्या कामात पारदर्शकता राखण्यासाठी मुंबईतील सर्व कंत्राटदारांचे कडक पोलीस व्हेरीफिकेशन आणि कामाची पडताळणी अनिवार्य केली जाणार आहे.
मराठी अस्मिता आणि भाषा विभाग: महानगरपालिकेत स्वतंत्र ‘मराठी भाषा विभाग’ स्थापन केला जाईल. तसेच मराठी तरुणांच्या शिक्षण, रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी विशेष ‘नवे धोरण’ राबवून त्यांना उद्योजक बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल.
बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ: मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांना जोडून ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ’ उभारण्यात येईल, ज्याद्वारे वैद्यकीय शिक्षणाच्या जागा वाढवण्यात येतील.
हुतात्मा स्मारकात जागतिक दर्जाचे संग्रहालय: संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी हुतात्मा स्मारक चौकात एक जागतिक दर्जाचे संग्रहालय उभारले जाईल.