अनिल कांबळे
नागपूर,
house dispute murder घर विक्रीवरून सुरू असलेल्या वादात गुन्हेगाराने शेजाèयावर काेयत्याने प्राणघातक हल्ला केला. रुग्णालयात उपचारादरम्यान जखमी शेजाèयाचा मृत्यू झाला. जखमीला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याचे नातेवाईकही जखमी झाले. ही थरारक घटना शुक्रवारी रात्री बारा वाजता जरीपटकाच्या लुम्बिनीनगर परिसरात घडली. मंगेश भीमराव भिमटे (42) रा. नजुल लेआऊट, लुंबिनीनगर असे मृताचे नाव आहे. पाेलिसांनी मंगेश यांचा मुलगा अक्षितच्या तक्रारीवरून आराेपी कुणाल उफर् गाेलू विद्याधर कांबळे (45) विरुद्ध गुन्हा नाेंदवून त्याचा शाेध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, house dispute murder, neighbor killed, मंगेश भिमटेच्या घराजवळच रमेश गेडाम यांचे घर हाेते. या घरावरून रमेशचा त्यांच्याच भावाशी वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी आराेपी गाेलूने घरासाठी ग्राहक आणला हाेता. रमेशच्या भावाने गाेलूसाेबत मिळून ते घर विकले. रमेश यांनी बनावट कागदपत्रांद्वारे घर विकल्यामुळे न्यायालयात खटला दाखल केला. मंगेश या कामात रमेश यांना मदत करीत हाेते. यामुळे गाेलू आणि मंगेश यांच्यात वैर निर्माण झाले हाेते. शुक्रवारी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास अक्षित घराच्या छतावर िफरत हाेता. या दरम्यान वडील मंगेश काम आटाेपून घरी येताना दिसले. घराजवळच गाेलूने त्यांचा रस्ता अडवला. काेयत्याने वार करून गंभीर जखमी केले. आरडा-ओरड झाल्याने मंगेशचे वडील भीमराव आणि पत्नी अमृता मदतीसाठी धावले. अमृताने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता गाेलूने त्यांच्या गळ्याला काेयता लावला. वडील भीमराव यांनी काठी मारून सुनेला वाचवले. या दरम्यान गाेलूने भीमराव यांच्या हातावर वार करून जखमी केले.
नागरिकांना धमकावून झाला पसार
परिसरातील नागरिक गाेळा झाले. आराेपी गाेलूने त्यांना धमकावले आणि घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर जखमी मंगेश यांना मेयाे रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भीमराव यांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. पाेलिसांनी खुनाचा गुन्हा नाेंदवून आराेपी गाेलूचा शाेध सुरू केला आहे. गाेलू हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्याविरुद्ध घराेडीचे गुन्हे नाेंद आहेत. तुरुंगातून बाहेर आल्यापासून ताे परिसरात दादागिरी करीत हाेता. घराच्या वादातून त्याने अनेकदा मंगेश यांना मारण्याची धमकी दिली हाेती.