'मानाचा मुजरा'! पाेलिस हवालदाराच्या लेकीचा लंडनमध्ये झेंडा

ग्रीनवीच विद्यापीठातून केले ‘टाॅप’

    दिनांक :11-Jan-2026
Total Views |
अनिल कांबळे
 
 
नागपूर,

Kritika Burbure, शहर पाेलिस दलातील पाेलिस हवालदाराच्या लेकीने शैक्षणिक बाबतीत माेठी झेप घेतली असून थेट लंडनमधील ग्रीनविच विद्यापीठातून टाॅप करण्याचा सन्मान मिळवला आहे. जवळपास शंभरावर देशातील विद्यार्थ्यांमध्ये हवालदाराच्या मुलीने पहिल्या क्रमांकाने यश मिळवून भारताचा झेंडा विदेशातही राेवला आहे. कृतिका प्रमाेद बुरबुरे असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
 

Kritika Burbure,  
प्रमाेद बुरबुरे Kritika Burbure, हे नागपूर शहर पाेलिस दलात पाेलिस हवालदार पदावर कार्यरत आहेत. ते सध्या कपिलनगर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांना कृतिका आणि ग्रीनीशा अशा दाेन मुली आहेत. बुरबुरे यांनी माेठमाेठ्या गुन्ह्यांच्या तपासात भरीव याेगदान दिले आहे. आपल्या मुलींनी उच्च शिक्षणासाठी विदेशात जाऊन नाव कमवावे, अशी मनाेमन इच्छा प्रमाेद आणि त्यांची पत्नी वर्षा यांची हाेती. दाेन्ही मुली अभ्यासात हुशार आहेत. कृतिका हिने नागपुरातील हिंगण्यातील प्रियदर्शनी काॅलेजमधून बी.ई (केमिकल) या विषयात पदवी संपादन केली. तर ग्रीनीशा ही बी.एस्सी (ायनान्स) पदवीचे शिक्षण घेत आहे. कृतिकाने बी.ई.पदवीतही तिने महाविद्यालयीतून द्वितीय क्रमांक मिळवला हाेता. तिने पुढील शिक्षणासाठी विदेशात जाण्याची तयारी केली. कृतिकाने लंडन शहरातील ग्रीनवीच विद्यापीठात ‘मास्टर्स इन केमीकल इंजिनिअरिंग’ या पदुव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. गेल्या दाेन वर्षांपासून ती लंडनमध्ये अभ्यास करीत हाेती. गेल्या दाेन दिवसांपूर्वी शुक्रवारी तिचा निकाल लागला. त्यामध्ये तिने विद्यापीठातून टाॅप केल्याची घाेषणा झाली. विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या हस्ते तिचा ट्राॅी देऊन सत्कार करण्यात आला.
पीएचडी करण्याचा मानस
 
 
गेल्या दाेन Kritika Burbure, वर्षांपासून लंडनमध्ये शिक्षण घेत असलेली कृतिका पदव्युत्तर पदवीनंतर पीएचडीसुद्धा करणार आहे. तिने शेती विकास हे क्षेत्र निवडले असून शेतकèयांना बी-बियाणे आणि शेतीतील पिक वाढीसाठी सुक्ष्म अभ्यास करण्याचे तिने ठरविले आहे. पर्यावरणाचा अभ्यास करणारी कृतिका पीएचडी संपादन केल्यानंतर भारतात परतणार असल्याची माहिती तिच्या आईवडिलांनी दिली.
 
 
वाढदिवशीच मिळाले गिफफ्ट
पदवीदान समारंभ Kritika Burbure, शुक्रवारी लंडनमध्ये विद्यापीठात आयाेजित करण्यात आला हाेता. त्याच दिवशी कृतिकाचा वाढदिवस हाेता. त्यामुळे आपल्या वाढदिवसाला माेठे सरप्राईज मिळाल्याची प्रतिक्रिया कृृतिकाने दिली.