अनिल कांबळे
नागपूर,
Yashodhara Nagar, वर्षभरापासून प्रेमसंबंध असतानाही प्रेयसीच्या जीवनात दुसरा युवक आला. त्यामुळे तिने पहिल्या प्रियकरापासून दुरावा निर्माण करुन मित्रासाेबत िफरणे सुरु केले. त्यामुळे चिडलेल्या प्रियकराने प्रेयसीवर हल्ला केला. तसेच तिला वाचविण्यासाठी समाेर आलेल्या तिच्या भावावरही काेयत्याने वार करुन जखमी केले. ही घटना यशाेधरानगर भागातील पिवळी नदी परिसरात साेमवारी उघडकीस आली. या प्रकरणी पाेलिसांनी आराेपीला अटक केली.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावीत शिकणाèया 15 वर्षीय मुलीची वर्षभरापूर्वी कुणाल सलामे या युवकाशी मैत्री झाली. त्याचे रुपांतर प्रेमात झाले. गेल्या वर्षभरापासून प्रेमसंबंध दाेघांमध्ये हाेते. मात्र, तिच्या जीवनात आणखी एक युवक आला. त्यानेही तिच्याशी मैत्री आणि प्रेमसंबंध ठेवले. दुसèया प्रियकरामुळे ती कुणालला टाळत हाेती. मात्र, कुणाल तिला बळजबरी भेटत हाेता. ही बाब घरच्यांच्या माहिती झाल्याने वडिलांनी मुलीला व कुणालला समजावून सांगितले. त्यामुळे मुलीने कुणालशी बाेलणे बंद केले. चिडलेल्या कुणालने तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. तिला िफरायला येण्यासाठी विचारणा केली.ती वारंवार त्याला उत्तर न देता निघून जायची. काही दिवसांपूर्वी ती एका दुसèया मुलाशी ती बाेलताना दिसल्याने कुणालला तिच्यावर संशय आला. त्याने याबाबत तिला विचारणा केल्यावरही तिने प्रियकर असल्याचे सांगून त्याला डिवचले. त्यामुळे ताे तिच्या घरासमाेर उभा राहून तिच्याशी बाेलण्याचा प्रयत्न करीत हाेती.
दरम्यान बहिणीला कुणाल त्रास देत असल्याने तिच्या भावाने त्याला बहिणीपासून दूर राहण्यास सांगितले. त्यातून दाेघांत वादही झाला हाेता. दरम्यान या वादातून कुणालने मुलीवर हल्ला केला. बहिणीला वाचविण्यासाठी आलेल्या प्रेयसीच्या भावावरही काेयत्याने हल्ला केला. दाेघेही भाऊ-बहीण गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यशाेधरानगर पाेलिसांनी आराेपीला शाेधून काही तासांतच ताब्यात घेतले आणि चाकू जप्त केला आहे. यापूर्वीही कुणालने प्रेयसीला अनेकदा मारहाण केल्याची माहिती समाेर आली आहे.