हनुमाननगरमध्ये महापारायण उत्सव

    दिनांक :11-Jan-2026
Total Views |
नागपूर,
Hanumannagar श्री संत गजानन महाराज जागतिक महा पारायण दिनानिमित्त हनुमाननगर येथील मीरा देवी दस्तुरे सभागृह, गृहिणी समाज, हनुमाननगर येथे सामूहिक महापरायण कार्यक्रम आज करण्यात आला. अनेक भाविक भक्तांनी सकाळी ६:०० वाजल्यापासून गजानन विजय ग्रंथाचे पारायण सुरू केले.
 
Hanumannagar
 
१२:०० वाजता आरती पार पडली आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात समाजातील सर्व स्तरातील भाविकांची उपस्थिती अनुभवायला मिळाली. Hanumannagar महापारायण दिनाच्या पूर्वसंध्येला हनुमाननगरमधील महिला भजनी मंडळांनी सुरेल भजने सादर केलीत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक महामंडळाच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले तसेच परिसरातील भाविकांनी सुद्धा उत्साहाने मदत केली. भाविकांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता.
सौजन्य: माधुरी पाडळकर, संपर्क मित्र