वर्धा,
MPSC exam महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) रविवार ११ जानेवारी रोजी जिल्ह्यातील पाच केंद्रांवर क श्रेणी अराजपत्रित पदांसाठी परीक्षा घेतली. परीक्षेसाठी १ हजार ५९४ उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र, पाच केंद्रांवर घेण्यात आलेल्या परीक्षेत ३२२ उमेदवारांनी दांडी मारली.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने राज्यातील विविध वर्ग ब आणि वर्ग क श्रेणीच्या विविध पदांसाठी परीक्षा घेऊन उमेदवारांची नियुती केली जाते. ब श्रेणी अराजपत्रीत व विविध विभागांच्या क श्रेणी कर्मचार्यांसाठी परीक्षा घेण्यात येते. पूर्व परीक्षेनंतर मुख्य मुख्य परीक्षा घेतली जाते. त्यानंतर मुलाखती आणि कागदपत्रांच्या पडताळणीद्वारे विविध पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाते. विद्यार्थी वर्षानुवर्षे या पदांसाठी तयारी करतात. गेल्या काही वर्षांपासून कोरोनामुळे परीक्षा घेणे शय झाले नाही. कोरोनानंतरही परीक्षा न घेतल्यामुळे विद्यार्थ्यांनी अनेक ठिकाणी आंदोलने केली. त्यानंतर गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये ब श्रेणीची अराजपत्रित परीक्षा घेण्यात आली. विविध पदांसाठी एकत्रित पूर्वपरीक्षा देखील डिसेंबरमध्ये घेण्यात आली होती. काही कारणांमुळे ही परीक्षा एक महिना उशिरा घेण्यात आली. दरम्यान, रविवार ११ जानेवारी रोजी जिल्ह्यातील पाच केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी १ हजार ५९४ अर्जदारांनी अर्ज केले होते. मात्र, ३२२ विद्यार्थ्यांनी दांडी मारल्याने १ हजार २७२ विद्यार्थीच परीक्षेला बसले होते.
जानकीदेवी बजाज सायन्स कॉलेजमध्ये ३६० पैकी २८६ उमेदवार परीक्षेला बसले होते. त्यापैकी ७४ गैरहजर होते. जीएस कॉमर्स कॉलेजमध्ये २४० पैकी ४७ गैरहजर तर १९३ उमेदवार परीक्षेला बसले होते. न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये ४०८ पैकी ३३२ उमेदवार परीक्षेला बसले होते, पैकी ७६ गैरहजर होते. न्यू इंग्लिश ज्युनियर कॉलेजमध्ये २६० पैकी २८४ उमेदवार परीक्षेला बसले होते, त्यापैकी ७६ गैरहजर होते. भरत ज्ञान मंदिरम येथे २२६ पैकी १७७ उमेदवारांनी परीक्षेला
एमपीएससी क श्रेणीसाठी पाच केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. परीक्षा सुरळीत आणि पारदर्शनपणे पार पाडण्यासाठी १३१ अधिकारी आणि कर्मचार्यांनी जबाबदारी सांभाळली. जेबी सायन्स कॉलेजमध्ये २८, जीएस कॉमर्स कॉलेजमध्ये २२, न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये ३१, न्यू इंग्लिश ज्युनियर कॉलेजमध्ये २८ आणि भरत ज्ञान मंदिरममध्ये २२ कर्मचारी होते.