अनिल कांबळे
नागपूर,
Nagpur murder, गेल्या काही दिवसांपासून हत्याकांडाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून गुन्हेगारांच्या आक्रमकतेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था धाेक्यात आली आहे. इमामवाडा पाेलिस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर तीन गुन्हेगारांनी एका व्यक्तीचा क्षुल्लक कारणावरुन खून केला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. मंगल मांगीया काेरी (50) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मंगल काेरीच्या खून प्रकरणात इमामवाडा पाेलिसांनी राेहन कमलाकर चावरीया (34) त्याचा लहान भाऊ राेहित कमलाकर चावरीया (32) आणि कुंदन देविदास चव्हाण (49) या तीन आराेपींना रविवारी पहाटेच्या सुमारास अटक केली.
सूत्रांनी दिलेल्या Nagpur murder माहितीनुसार, चावरीया भावंडांची इमामवाडा-जाततराेडी परीसरात चांगली दहशत आहे. गुन्हेगार चावरीया भावंड सामान्य नागरिकांना त्रस्त करीत दबदबा कायम ठेवतात. इमामवाडा पाेलिस ठाण्याच्या मागच्या गल्लीत राहणारे मंगल काेरी आणि चावरीया भावंडांमध्ये क्षुल्लक कारणावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु हाेता. शनिवारी रात्री मद्य प्राशन करून आलेल्या राेहन चावरीयाने घराबाहेर उभ्या असलेल्या मंगल काेरी यांना शिविगाळ सुरू केली. त्याचा आवाज एकून मंगलचा मुलगा शुभमने आक्षेप घेतला. त्याच वेळी राेहनचा भाऊ राेहित चावरिया आणि मित्र कुंदन चव्हाण या तिघांनी मंगल काेरीया यांना मारहाण सुरू केली. राेहनने लाकडी दांड्याने मंगल यांच्यावर हल्ला केला. मंगलच्या डाेक्यावर दंड्याचा मार बसल्यामुळे ताे गंभीर जखमी झाले. मंगल रक्ताच्या थाराेळ्यात खाली काेसळले. मंगल मृत पावल्याचे बघून आराेपींनी तेथून पळ काढला.कुटुंबियांनी मंगल यांना मेडिकल रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या हत्याकांडाबाबतत इमामवाड्याचे ठाणेदार जयवंत पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी कामात व्यस्त असल्याची प्रतिक्रिया दिली.
.
तीनही आराेपींना अटक
इमामवाडा पाेलिसांनी राेहन आणि राेहित चावरीया भावंडासह कुंदन चव्हाण या तीनही आराेपींविरुद्ध हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेचे पथक आणि इमामवाडा पाेलिसांनी आराेपींची लगेच शाेध माेहिम सुरु केली. तीनही आराेपींना पहाटे विविध ठिकाणांवरुन अटक केली. आराेपींपैकी राेहन चावरिया आणि कुंदन चव्हाण विराेधात यापूर्वी पाेलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत, हे विशेष.