सायबर व फॉरेन्सिक विज्ञानाबाबत जनजागृती

विदर्भ विज्ञान उत्सवात एनएफएसयू नागपूरचा पुढाकार

    दिनांक :11-Jan-2026
Total Views |
नागपूर,
National Forensic Sciences University, विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळाच्या वतीने आयोजित विदर्भ विज्ञान उत्सवात नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी (एनएफएसयू), नागपूर कॅम्पसने प्रभावी व लक्षवेधी सहभाग नोंदवला. दिनांक ९ व १० जानेवारी रोजी पार पडलेल्या या विज्ञान उत्सवात फॉरेन्सिक सायन्स, सायबर सुरक्षा आणि डिजिटल फॉरेन्सिक्स क्षेत्रातील प्रात्यक्षिकांमुळे एनएफएसयूचे दालन विशेष आकर्षण ठरले.
 

National Forensic Sciences University,  
एनएफएसयू नागपूर National Forensic Sciences University, कॅम्पसचे निदेशक प्रा. डॉ. एस. ओ. जुनारे यांच्या अध्यक्षतेखाली प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी अनुकरणात्मक गुन्हेस्थळ, फॉरेन्सिक फील्ड किटद्वारे प्राथमिक तपास चाचण्या तसेच सायबर सुरक्षा व डिजिटल फॉरेन्सिक्सची प्रत्यक्ष माहिती देणारे सादरीकरण केले. या माध्यमातून तपास प्रक्रियेतील वैज्ञानिक पद्धती, पुराव्यांचे संकलन व विश्लेषण याविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती मिळाली. विदर्भातील विविध जिल्ह्यांतून आलेले विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी या सादरीकरणाला मोठा प्रतिसाद दिला. “शोधकार्यातून शिक्षण” या एनएफएसयूच्या तत्त्वज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव या प्रदर्शनातून मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. फॉरेन्सिक सायन्स आणि सायबर सुरक्षा या आधुनिक व करिअरदृष्ट्या महत्त्वाच्या शाखांबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली.
 
 
नॅशनल फॉरेन्सिक National Forensic Sciences University, सायन्सेस युनिव्हर्सिटी ही संसदेच्या अधिनियमाद्वारे स्थापन झालेली, जगातील पहिली व एकमेव फॉरेन्सिक व संलग्न विज्ञानांसाठी समर्पित विद्यापीठ असून ती केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे. एनएफएसयूचा नागपूर कॅम्पस सध्या अंबाझरी रोडवरील आय.टी. पार्क, सुभाषनगर येथे तात्पुरत्या स्वरूपात सुरू आहे. दरम्यान, कामठी तहसीलमधील चिचोली गावात ५० एकर क्षेत्रावर अत्याधुनिक प्रयोगशाळा, संशोधन व प्रशिक्षण सुविधांनी युक्त भव्य स्थायी कॅम्पस उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून, हा कॅम्पस मध्य भारतातील फॉरेन्सिक विज्ञानाचे उत्कृष्टता केंद्र ठरेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. विदर्भ विज्ञान उत्सवातील एनएफएसयू नागपूर कॅम्पसचा सहभाग वैज्ञानिक तपास पद्धतींबाबत जनजागृती वाढवणारा ठरल्याचे आयोजकांनी नमूद केले.